नांदेड : जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून बिलोली तालूक्यातील अर्जापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक शेख सलीम खुर्शीद अहेमद व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद यांच्या प्रयत्नातून एक आगळा वेगळा कार्यक्रम घेवून विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आले.

दि.8 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त थोर महान स्त्रीयांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यशवंत हायस्कूल बिलोली चे मुख्याध्यापिका श्रीमती संगीता गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली शाळेत एक आगळावेगळा कार्यक्रम घेऊन महिला दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयाचे महिला सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती महिला सदस्य, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अर्जापूर येथील समुदाय आरोग्य महिला अधिकारी डाॅ. वर्षा हत्ते मॅडम, सिस्टर सी.के. करडे मॅडम,आशा वर्कर, ग्रामपंचायत कार्यालय महिला डॉटा ऑपरेटर,अंगणवाडी क्रमांक एक,दोन व तीन चे अंगणवाडी ताई व अंगणवाडी मदतनीस, शाळेतील सर्व महिला शिक्षिका, शालेय पोषण आहार महिला स्वयंपाकी, गावातील सामाजिक कार्यकर्ती, महिला बचत गटाचे दोन अध्यक्ष, गावातील तीन सैनिकांचे पत्नी, मसनजोगी समाजातील अख्ख्या महाराष्ट्रातील पहिली महिला माजी उपसरपंच, गावातील सर्वात वयोवृद्ध 100 वर्ष ची महिला, गावात मुलीच असणारे महिला, गावात मुली असणारे माताचे 100% मुली नोकरीला आहे असे माता, गावात सर्वात जास्त आठ मुली असणारी माता सर्व मुलींना उच्च शिक्षण घेऊन चांगल्या घरी लग्न करून दिले असे कर्तृत्वान वरील महिलांचा शाळेतर्फे फेटा बांधून पुष्पहार व ब्लाउज पीस देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक महिला दिनाबद्दल प्रस्ताविक मांडले व अध्यक्ष संगीता गंंगवर ताई महिलांना अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले त्यानंतर प्रथमिक आरोग्य उपकेंद्र अर्जापूर चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा हत्ते मॅडम यांची मुलाखत शाळेतील विषय शिक्षक मरकंटे सर यांनी अतिशय उत्कृष्टपणे घेतली त्यानंतर आमच्या शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम यांनी गावातील सर्व कर्तुत्वान महिलांचे प्रश्नमंजुषाचा खेळ हसत-खेळत घेऊन सर्वांना वर्गातील लहानपणाची आठवण करून मंत्र मुग्ध केले त्यानंतर दुसरी मुलाखत कोरोना योद्धा, एक उत्तम कुस्तीपटू सुवर्ण व सिल्वर पदक प्राप्त महिला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अर्जापूर येथील महिला आरोग्य सेविका सी के करडे मॅडम यांची मुलाखत आमच्या शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टपणे मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमध्ये असा एक प्रसंग आला की आरोग्य सेविका करडे मॅडम नि त्या ठिकाणी खूप भावना होष होऊन खूप रडले प्रसंग होता रुग्णाची सेवा करता करता त्यांना सुद्धा कोरोना हा आजार झाला होता त्यावेळेस पती मुलगा मी तिघेही एकवीस दिवस होते आणि त्या वेळेस खूप दुःख वाटलं त्याने आपल्या मुलाखतीत सांगितले मुलाखतीनंतर आलेल्या कर्तत्वान महिलांचं आमच्या महिला भगिनी सौ.खिसे मॅडम यांनी सर्व महिलांचा संगीत खुर्ची हा खेळ घेतला वयाचे भान न ठेवता सर्व महिलांनी अगदी लहान मुलासारखं हा खेळ खेळुन खूप मजा केली त्यानंतर सौ सोंमपुरे मॅडम यांनी सर्व महिलांचा फुगा फोडीचा खेळ घेऊन सर्वांना लहानपण देगा देवा ची आठवण करून आनंदित केले त्यानंतर गायकवाड मॅडम यांनी बादलीत चेंडू टाकने हा खेळ घेऊन महिलांना आनंदित केले खिचडी वाले मावशी यांनी मेणबत्त्या पेटवण्याचा खेळ घेतला या सर्व खेळात सर्व शिक्षक बंधू पडद्या पाठीमागची भूमिका उत्कृष्टपणे बजावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्टपणे नवाथे सर यांनी केले उपस्थित सर्व महिलांचे आभार शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक साजिद सर केले शेवटी सर्व महिलांना एक वेळेचे स्वयंपाकाला सुट्टी म्हणून शाळेत सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.