section and everything up until
* * @package Newsup */?> नंदुरबार शहरातील पटेलवाडी येथील घटना ; चाकुने वार | Ntv News Marathi

तिघे गंभीर जखमी :चौघांविरुध्द गुन्हा दाखल !!!

नंदुरबार – घरात घुसून लोखंडी पाईप , लाकडी डेंगाऱ्याने मारहाण व चाकुने वार केल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना नंदुरबार शहरात घडली . या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


नंदुरबार येथील पटेलवाडीत राहणारी फरीदा मोहम्मद नुर शेख यांच्या घरी रात्री ११ वाजेच्या सुमारास चार जणांनी लोखंडी पाईप , लाकडी डेंगारा घेवुन अनधिकृत पणे प्रवेश केला .तसेच यावेळी चौघांनी एजाज यास लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी के ले . लाथा बुक्क्यांनी ही मारहाण केली . यावेळी मुश्ताक मो . शेख व इफ्तेखार मो . नुर शेख हे दोघे या दोघांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला . रफिक पिंजारी याने हातातील चाकुने छाती वर सपासप वार करीत मुश्ताक शेख यांना गंभीर जखमी केले . त्यांना इफ्तेखार वाचविण्यासाठी गेले असता रफिक पिंजारी याने चाकुने वार करीत इफ्तेखार यांना जखमी केले . तसेच फरीदा शेख या महिलेला शिवीगाळ करुन दमदाटी केली .या बाबत फरीदा मोहम्मद नुर शेख यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .त्यानुसार रफीक अय्युब पिंजारी , सुलतान अय्युब पिंजारी , रशिद अय्युब पिंजारी व एक अनोळखी इसम ( सर्व रा . पटेलवाडी ) या चौघांविरुध्द भादंवि कलम ३०७ , ४५२ , ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे नंदुरबार शहर पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तिघांना अटक करण्यात आली.
सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार , ,नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील ,यांनी सदर कामगिरी केली.पुढील तपास करीत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *