पुणे : स्वातंत्यांवसच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम घराघरात पोहचविण्यासाठी सर्व यंत्रणेचा सहभाग घ्यावा. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रम यशस्वी करावा. घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
विभागीय आयुक्त श्री.राव यांनी बैठकीत पुणे विभागातील विविध विषयांबाबत सादरीकरण केले. विभागात ३१ जुलैपर्यंत सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला आहे. विभागातील मोठ्या प्रकल्पात ७१ टक्के, मध्यम प्रकल्पात ६५ आणि लघू प्रकल्पात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. ४४ तालुक्यातील १५० महसूली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या ७ व्यक्तींच्या वारसांना २८ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. २ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस माजी मंत्री तानाजी सावंत, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, महेश लांडगे, सुनिल कांबळे, अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागातील इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.प्रारंभी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचे विभागीय आयुक्त राव यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे पुणे