पुणे:जिल्ह्यातील इंदापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलीचा विनयभंग प्रकरण नुकतेच उघड झाले. यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोप करण्यात आलेल्या शिक्षकाला निलंबित केले आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत विधानसभेच्या प्रभारी सभापती तथा उपसभापती डॉ.नीलम गोरे यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. येथील स्थानिक पालक आणि प्रसार माध्यमांनी याची गंभीर दखल घेऊन पाठपुरावा केल्याने संशयित आरोपी शिक्षक याला तात्काळ निलंबित करण्यात आले. यापूर्वीही याच शिक्षकाने असेच गैरकृत्य केल्यानंतर केवळ माफीनामा लिहून हे प्रकरण दडपल्याचा आरोप आहे.संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या या घटनेबद्दल पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील सर्वच शाळांची विशेष समितीमार्फत पाहणी व्हावी अशी मागणी आहे
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी- पल्लवी चांदगुडे भिगवण (पुणे)