अहमदनगर : नगर शहरामध्ये भरत नाट्यम डान्स विशारद या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अंकिता मिलिंद देखणे हिला उत्कृष्ट श्रेणी पुरस्कार प्राप्त होऊन तीने विशारद पदवी प्राप्त केली आहे. तिच्यासह 13 मुलींना ही पदवी प्राप्त झाली आहे. नगर शहरामध्ये लय शाला नृत्यकला निकेतन भरतनाट्यम या संस्थेच्या मार्फत कोर्सचे आयोजन करण्यात येते .मंजुषा मुकुंद देशमुख व सुनिता महेश शेटे यांनी या संस्थेची स्थापना केली आहे.भरत नाट्यम या अभ्यासक्रमामध्ये अनेक विषय शिकवले जातात. गेल्या सहा वर्षांपासून नगर शहरातील 13 मुलींनी ही परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांना सुद्धा विशारद पदवी मिळाली आहे. .यामध्ये तनिषा गांधी,युक्ता सावदेकर,अंकिता देखणे ,वेदांती साखरकर,गार्गी भालसिंग,संयुक्त रेखी ,राजेश्वरी मुळे ,इशिता बोरा,याशिका सोनी,स्नेहा सुरवसे, इशिता जामगावकर यांचा समावेश आहे.
आज या सर्वांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. व त्यांना मिळालेल्या पदवी बद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी बोलताना सुनीता शेटे यांनी या कोर्समध्ये मुलींनी भाग घेतला लॉकडाऊन च्या काळात सुद्धा सर्वांनी अतिशय मेहनत घेतली परिश्रम घेतले व परीक्षा उत्तीर्ण झाले ही सुद्धा कौतुकाचीच बाब आहे असे त्या म्हणाल्या .या यशाबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता शेटे यांनी केले तर आभार इशिता शेटे यांनी मांडले.