वाशिम:- वाशिम शहराला पाणी पूरवठा करणारे एकबुर्जी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे . या सांडव्यावर असलेल्या धबधब्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक पर्यटनासाठी व पोहण्यासाठी प्रशासनाचा आदेश न जुमानता जातात . मात्र प्रशासनाकडुन धोका लक्षात घेऊन तिथे जाण्यास मनाई केली आहे . परंतु पाच ते सहा युवक आज दुपारी 4:00 वाजता दरम्यान सांडव्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते , परंतु त्यांना पोहने येत नसल्याने हे युवक सेल्फी काढण्याच्या नादात काटावर उभे होऊन त्यापैकी दोन जणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांनी सांडव्यात उड्या घेतल्या तें दगडावर पडले , त्त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तें पाण्यात मृत्यूमुखी पडले . मृत्यूमुखी पडलेल्या मुलांचे नाव शेख शोएब शेख अन्सार वय 18 वर्षे , रा शेर दर्ग्याच्या पाठीमागे मंगळवारी वेस वाशीम ता . जि . वाशिम , शेख आवेश शेख अनिस वय 15 वर्षे रा . नबी साहेब मस्जिद जवळ , खाटिक पुरा , वाशिम , ता . जि . वाशिम सदर घटनेचा पुढील तपास वाशीम ग्रामीण पोलीस स्थानकाचे ठाणेदार विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे . गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे . आज सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने काही भागातील नदी नाल्यांना पूर आला . तर भटउमरा परिसरात मोठ्य प्रमाणात पाऊस झाल्याने पूस नदीला जोडणाऱ्या नाल्याला पूर येऊन वाशिम वरून गावी जाणारे नागरिक अडकले आहेत .
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206