विघ्नहर्त्यांच्या ऊत्सवातच निराधारांवर विघ्न
वाशिम : मंगरुळपीर येथील संगायो विभागातील विविध योजनेअंतर्गत पेन्शन मिळत असते परंतु ‘त्या’ बॅकेने ऊडवाऊडवीची ऊत्तरे देवून यावेळी बिल स्विकारण्यास नकार दिल्यामुळे तब्बल तिन महिन्याचे अंदाजे साडेतिन कोटींची बिले फायलितच बंद असुन निराधारांच्या अनुदानावर विघ्नहर्त्याच्याच ऊत्सव कालावधीमध्ये विघ्न आल्यामुळे मोठे आर्थिक संकट ऊभे ठाकले आहे अशी माहीती प्राप्त झाली आहे.वरिष्ठ प्रशासनाने याविषयी सखोल चौकशी करुन बिले स्विकारण्यास नकार देणार्या त्या बॅकेतील सबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मंगरुळपीर तालुक्यातील निराधारांनी केली आहे.
तसहिल कार्यालयाअंतर्गत संगायो विभागाच्या माध्यमातुन श्रावण बाळ,दिव्यांग योगना,निराधार,विधवा,परितक्त्या,कुटुंब अर्थसाहाय्य आदी योजनेचे अंदाजे सोळा हजार लाभार्थी अनुदानाचा लाभ घेत असल्याचे कळते.या विविध योजनेतील लाभार्थ्यांना प्रशासनाकडुन अनुदान प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांनी नेमुन दिलेल्या बॅकेतील खात्यात अनुदान पाठवण्यात येते.या अनुदानामुळे लाभार्थ्यांना जीवन जगण्यासाठी,ऊदरनिर्वाहासाठी मोठा हातभार लागतो.शासनाच्या या स्तुत्यपुर्ण योजनेमुळे हजारो लाभार्थ्यांना जगन्याचे बळ मिळते.हे अनुदान दरमहिन्याला तर कधी दोन महिन्याचे एकदाच अशाप्रकारे बॅकेत पाठवुन लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्याची प्रक्रीया केली जाते.सदर संगायो विभागाचे विविध योजनेचे अनुदान हे कोट्यावधीच्या घरात असते.परंतु तिन महिन्याचे बिल एका मंगरुळपीर शहरातील बॅकेने स्विकारन्यास नकार दिल्यामुळे ते लाभार्थ्यांच्या खात्यात पोहचु शकले नाही.सदर प्रलंबित अनुदान हे साडेतिन कोटी रुपये असल्याचे कळले.संबधित विभागातील कर्मचार्यांनी बॅकेकडे बिले सादर केल्यानंतर हे बिले घेण्यास नकार दिला याविषयी विचारणा केली असता ऊडवाऊडवीची ऊत्तरे बॅकेकडुन देन्यात आल्याचे कळले.आता श्री चा ऊत्सव प्रारंभ झाला.हे सणासुदीचे दिवस असुनही निराधारांना अनूदान मिळू शकले नाही.बॅकेच्या अशा हेखेखोरपणामुळे निराधारांच्या हक्कावर विघ्न आल्यामुळे गरिबांपुढे मोठा आर्थीक प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हाधिकारी व सबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी या बाबीची गंभीरतेने दखल घेवुन निराधारांना त्वरीत अनूदान प्राप्त होइल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आता होत आहे.आणी आतापर्यत कोट्यावधींच्या बिलावर कमीशन खावुन गब्बर झालेल्या व आता बिले स्विकारण्यास नकार देणार्या बॅकेवर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206