अहमदनगर – नगर औरंगाबाद महामार्गावरील अकबर नगर येथे आमिर मळा मध्ये जमिनीच्या वादातून बशीर पठाण यांना जिवंत जाळल्याची घटना नुकतीच समोर आली होती
बशीर पठाण यांना जिल्हा रुग्णालयात उच्चारासाठी दाखल केले होते प्रकृती खालावल्याने पुणे येथे पाठवण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे त्यांचे शव घेऊन आंदोलन
करण्याचा प्रयत्न केला परंतु शहर पोलीस उपाधीक्षक कातकडे यांनी सदर कुटुंबीयांना खुनाचा दाखल करू असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन उपोषण करण्याची भूमीकेला स्थगिती दिली तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.