वाशिम : मंगरुळपीर शहरातील लाईट ऐन सणासुदीत गायब होत असल्याने व सतत विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे मंगरुळपीर शहरातील व ग्रामीण भागातीलही नागरिक सोशल मीडियावर आक्रमक होतांना दिसत आहेत.
सविस्तर माहिती अशी की,सध्या गणेशोत्सव सूरु आहे तसेच हिंदू समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या गौराई चे सुध्दा आज आगमन झाले आहे, मात्र गेली अनेक वेळा मंगरुळपीर शहरातील लाईट लपंडाव खेळत असल्याने व विजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहरातील नागरिक आक्रमक झाले असून सोशल मीडियावरती पोस्टचा पाऊस पडत आहे.सोशल मीडियावर नागरिक आक्रमक होताना दिसत असून ऐन सणासुदीत लाईट गायब ..? असे म्हणत MSEB वर नागरिकांनी टीकेची झोड उठवली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206