९ व १० च्य शेकडो विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक संच निःशुल्क वाटप..
उमरखेड : महाराष्ट्र राज्यात महिलांच्या हक्क संबंधी विषयी तसेच शिक्षण विषयी नेहमी प्रयत्नशील असणारी यवतमाळ जिल्हा उमरखेड येथील महिला संगठन सत्यानिर्मिति महिला मंडळ उमरखेड तर्फे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नव्वी व दहावी च्या ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुस्तक संच घेण्यास आसमर्थ असतात व पुस्तक नसल्यामुळे पुढील शिक्षण सुटते ज्यात मुलींचा समावेश जास्त असते व हीच समस्या समजून महाराष्ट्र मध्ये महिलांच्या व बालकांच्या अधिकार शिक्षण रोजगार व सरक्षन साठी नेहमी प्रयत्न करणारी सत्यानिरमिती महिला मंडळ उमरखेड ह्यांनी सन २०१२ साली बेटी पाढाओ भविष्य बचाव महनुण महिलांच्या शिक्षणाची अडचण समजून अभियान सुरू केले व या अभियान अंतर्गत ज्या मुलींना व मुलांना शिक्षण विषयी होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात व मुले व मुली शिक्षण क्षेत्रात समोर जावे व देशाचे नाव मोठे करावे व स्वावलंबी असावे या उद्देशाने त्यांना दर वर्षी नववी व दहावी चे सर्व शालेय साहित्य व पुस्तक संच मंडळाच्या व विविध सामजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने दिले जाते या विशेष अभियान अंतर्गत शहर व तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन पुस्तक संच व शालेय साहित्य देण्यात येते विशेष पुस्तक संच देणारी व मुलींना मार्गदर्शन करणारी महारष्ट्र राज्यातील ही एकमेव संघटना आहे संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा विश्व शांतीदूत सौ शबाना खान यांनी हे अभियान शासनाच्या कोणत्याही प्रकारची सहायता न घेता समजा साठी निस्वार्थ काम करणाऱ्या सेवक यांच्या मदतीने सुरू केली आज दहा वर्ष हे अभियान महारष्ट्र मध्ये बरेच जिल्ह्यात सात्यानिर्मिति महिला मंडळ शाखे द्वारे चालविण्यात येत आहे उमरखेड शहरात नगर परिषद अधिनिस्त उच्च माध्यमिक शाळेत आज रोजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुस्तक संच व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आले शहरातील एकही विद्यार्थी पुस्तकाच्या आभाव पोटी शिक्षण वंचित राहू नये व सर्वांना शिक्षण व शिक्षण साहित्य मिळावे या उद्देशाने आज कार्यक्रम शाळेत घेण्यात आला बेटी पाढाओ भविष्य बचाव अभियान सप्ताह ची आज सुरुवात करण्यात आली तालुक्यातील कोणतेही शाळेत गरजू विद्यार्थी यास मांडला तर्फे शालेय पुस्तक संच निःशुल्क देण्यात येते प्रशासन सर्व शिक्षण अभियान अंतर्गत फक्त आठवी पर्यंत पुस्तक संच मोफत देते पण आठवी नंतर गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण साठी पुस्तकाची व्यवस्था करणे शासनाचे काम असून अद्याप हे सुरू झाले नाही ज्यामुळे सत्यानिमिती महिला मंडळ ने या मुलींच्या भविष्य साठी असलेली मूलभूत समस्या लक्षात घेऊन हे बेटी पाढाओ भविष्य बचाव अभियान सुरू केले जे दर वर्षी यशस्वी होत आहे व आज या सप्ताह अभियान ची सुरुवात झाली व राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यात सुध्धा मंडळ हे अभियान सुरू केले आहे आज शहरात हे निःशुल्क पुस्तक संच कार्यक्रम संपन्न झाला मुलींना मजबूत सक्षम बनने करिता अमूल्य मार्गदर्शन शिबिर सुद्धा घेण्यात आली महिला जन जागृती व कायदेविषयक अधिकार संबंधी तपशीलवार मार्गदर्शन अध्यक्षा सौ शबाना खान यांनी केले या वेळी सत्यानिर्मितीं महिला मंडळ उपाध्यक्ष मीरा मगरे,सचिव सीमा खंदारे,सह सचिव रेहाना दादू,कोषाध्यक्ष सविता भागवत, सह कोष्ध्यक्षा तबसुंम सय्यद,कार्यकारी डॉ वंदना मर्सुळकर,सौ पुरी, आसिफा बी,रेहाना सिद्दी,कोमल धाडे,मुबिना शेख,मंदा शैले,तसेच सर्व मंडळ शहर टीम व शालेय सर्व मुख्याध्यापक, शिक्षक,अधिकारी,कर्मचारी,पालक समित्या व शेकडो विद्यार्थी व पालक उपस्थित होते.