सामाजिक संस्थांकडून राबविले सेवाभावी उपक्रम.
*वृक्षारोपण ,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.
पालघर : जव्हार तालुक्यात ७५ , व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाची रेलचेल पाहावयास मिळाली.यंदा कोरोनामुळे काही नियमांचे पालन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या निघाल्या नाहीत.परंतु शाळा,महाविद्यालये ,शासकिय कार्यालये,न्यायालय,अर्बन बँक, गांधी चौक,राधा विद्यायय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,ग्रामीण भागातील जिल्हा परिषदशाळा,शासकीय दवाखाने या ठिकाणी स्वातंञ्य दिनी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
शहरातील काही सामाजिक संस्थाकडून अमृत महोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन आदिवासी पाड्यावंर भेटी देऊन समाजाच्या विकासाबाबत सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले.त्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार,विक्रमगड,मोखाडा,कारेगाव चे प्राचार्य रोहन चुंंबळे यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी ,कर्मचारी वृंद दिनेश कुमार पडवळ,प्रकाश चुंबळे यांच्या समवेत काही तरुणांनी स्थापन केलेल्या परिवर्तन पुरुष बचत गटाच्या पर्यटन प्रकल्पाला जाऊन भेट दिली.तेथील खडखड धरणाच्या बाजूला ढापरपाडा येथे जव्हार पंचायत समिती कडून वृक्षारोपनाच्या आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.शासनाची बसही ज्या पाड्यावर जात नाहीत अशा पाड्यावरती जाऊन आयटीआय प्रवेशाबाबतची माहिती तेथील तरुणांना दिली.
तसेच कुंडांचा पाडा येथे आदिवासी पाड्यावर स्वातंत्र्य दिनी युवा सामर्थ्य प्रतिष्ठान, मानवाधिकार फाऊंडेशन व मुंबईचा क्रांतिज्योती सावित्रीबाई भरारी सोशल ग्रुप व मानिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पाड्यावर कुंडांचा पाडा येथे जीवनावश्यक वस्तुंचे वापट करण्यात आले .त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. खोडाळ्या मधील गोमघर येथे आरोहन सामाजिक संस्थेकडून शिक्षण विभागाच्या उपक्रमा अंतर्गत हसतखेळत शिक्षण कोरोना काळात राबविले जात आहे.त्याद्वारे काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन गोमघरच्या राघोजी भांगरे समाज मंदिराच्या सभागृहात कोरोना नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह कायम होता. याशिवाय वाँक टुगेदर फाऊंडेशचे कासेगावं शिक्षण संस्थेचे "महादेइ पनमेशरी दास जिंदल हायस्कूल" न्याहाळे बुद्रुक याठिकाणी शालेय विद्यार्थी ,कर्मचारी वृंद ,ग्रामस्थांच्या उपस्थितीत ७५ वा स्वातंत्र्य दिन ग्रामीण भागात उत्साहाने जल्लोषात साजरा झाला.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं.8408805860/मो.9404346064.