पुणे नगर महामार्ग हा कायमच वाहतुकीचा वर्दळीचा रस्ता महामार्ग आहे. तसेच या महामार्गांवर पंचतारांकित एम आय डी सी आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते.तसेच पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक शिरूर आहे. शिरूर येथूनच अहमदनगर जिल्हा सुरु होतो.तसेच मराठवाडा,विदर्भ, खानदेश यांचे हे प्रवेशद्वार आहे. पुणे जिल्ह्यात कामानिमित्त याच भागातून मोठया प्रमाणात कामगार वर्ग येतो.या भागात ये-जा करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेस दिवस-रात्र धावत असतात परंतु परंतु प्रवासी संख्या जास्त व महामंडळच्या बसेस अपुऱ्या पडतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बसेस (ट्रॅव्हल्स) यांचे चांगलेच फावते पुणे येथून विदर्भ, मराठवाडा, खानदेशकडे जाणारा प्रवासी हे मुख्यत वाघोली, लोणीकंद,कोरेगाव-भीमा,सणसवाडी, शिक्रापूर,कोंढापुरी,रांजणगाव,कारेगाव, शिरूर येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी खासगी बसेस मधून प्रवास करतात कारण की राज्य परिवहन महामंडळाच्या बस या पुणे शिवाजीनगर बस स्थानकातूनच एक तर भरून निघतात किंवा या विविध ठिकाणी थांबत नाहीत त्यामुळे येथून प्रवास करणारे प्रवासी आपोआपच खाजगी बस (ट्रॅव्हल्स) कडे वळू लागली कारण खासगी बसेसला रस्त्यावर उभे राहून कुठे ही हात केली की थांबतात. तसेच प्रवाशी यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारे बसेस सजवल्या जातात व तिकिटाचा तर सुद्धा कमी केला जातो.परंतु या खाजगी बसेसनी प्रवास करणे किती धोकादायक आहे हे प्रवाशांना कळत नाही. तसेच खासगी बसेस शिक्रापूर, रांजणगाव, कारेगाव या ठिकाणी महामार्गवरील रस्त्यावर मध्येच उभी राहतात व यामुळे मोठ्याप्रमाणात इतर वाहनांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.तसेच यांना संबंधित पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस व महामार्ग वाहतूक पोलीस काहीच म्हणत नाही अथवा यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही.या खासगी बसेसवाल्यांना कोणाचे ही भय नसल्या सारखे झाले आहे. या खाजगी बसेसमुळे(ट्रॅव्हल्स)मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा काही घटना याअगोदर सुद्धा घडल्या आहेत.कारण की या बसेसचे चालक भरधाव वेगाने बस चालवतात यांच्या मध्ये प्रवासी घेण्याची जीवघेणी स्पर्धा लागलेली असते.अशीच एक दुर्दैवी घटना शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 19 डीसेंबर 2015 रोजी बोऱ्हाडे मळा हॉटेल वैभव समोर घडली अशा बसमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. असे छोटे -मोठे अनेक अपघात या बस रस्त्यामध्ये उभे केल्यामुळे घडल्या आहेत. दुचाकीस्वार या बसेसला धडकण्याची अनेक घटना घडल्या व यातून वाद सुध्दा झालेआहेत. पुणे-नगर महामार्गा च्या वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक शाखा आहे तसेच शिक्रापूर, रांजणगाव व शिरूर पोलीस स्टेशन यांच्याकडे वाहतूक पोलीस आहेत.परंतु या वाहतूक शाखेला वाहतूक पोलिसांना या खाजगी बसेस (ट्रॅव्हल्स)दिसत नाहीत का?असा सवाल येथील नागरिक करत आहेत. या वाहतूक शाखेचे मुख्यत काम रस्ते अपघात टाळणे,महामार्गावरील गर्दीच्या ठिकाणी रहदारीचे नियमन करणे हे वाहतूक शाखेचे काम आहे परंतु शिक्रापूर, रांजणगाव,कारेगाव या ठिकाणी वाहतूक शाखा या खासगी बसेसवर कारवाई करताना दिसत नाही. या वाहतुक शाखा काही मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का? किंवा या खाजगी बसेसवाल्यांचे (ट्रॅव्हल्स) कोणाशी काही आर्थिक हित संबंध तर नाहीत ना? असे अनेक प्रश्न यामुळे डोकेवर काढत आहेत. वाहतूक पोलिस या खासगी बसेस ट्रॅव्हल्स मुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे. तसे नसेल तर एखादी दुर्घटना घडण्या अगोदर वाहतूक पोलिस खाजगी बसेस (ट्रॅव्हल्स) यांच्यावर कारवाई करून व त्यांचे अनधिकृत थांबे बंद करणार का?याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.