अहमदनगर विभागाच्या खो खो आंतर महाविद्यालय स्पर्धेत पेमराज सारडा महाविद्यालयाने न्यू आर्टस् सायन्स कॉमर्स अहमदनगर महाविद्यालयाचा अंतिम सामन्यात पराभव केला. सलग सातव्यांदा आंतर महाविदयालयाचे विजेतेपद हे सारडा महाविद्यालयाला मिळाले. अहमदनगर विभागासाठी सहा जणांची निवड महाविद्यालयातून झाली आहे. निवड झालेले खेळाडू अतुल मगर,प्रवीण मगर, विशाल डूकले, आदित्य कुदळे, आवेज पठाण, संकल्प थोरत.प्रा. संजय धोपावकर,प्रा. संजय साठे,प्रा. अक्षय कर्डिले यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र शिंदे, उपप्राचार्य प्रा.मिलिंद देशपांडे यांनी खेळाडूंना प्रोहत्सान दिले,मानद सचिव श्री.संजय जोशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन ˈअड्व्हकेइट्. फडणीस साहेब, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री. सुमितिलाल कोठारी साहेब यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले
