वाशिम:-लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वाशिम जिल्ह्यात दक्षता जनजागृती अभियान सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास ३१ आॅक्टोबर पासून प्रारंभ झाला असून ६ नोव्हेबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम पोलीस उपअधीक्षक श्री.गजानन शेळके यांनी दिली.जिल्ह्यात कलापथक,नाटक आणि पोष्टरव्दारे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करुन जनजागृती सुरु आहे.

सरकारी कार्यालयात चालणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा करण्यात आला आहे. त्याची महिती सर्वसामान्य जनतेला करून द्यावी. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कामकाज कसे चालते यांची माहिती जनतेला देणे हा या अभियानाचा हेतू आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.श्री.शेळके यांनी सांगितले.वाशिम जिल्ह्यात चालु वर्षात लाचलुचपत विभागाने अनेक कारवाया केल्या.

गेल्यावर्षी यशस्वी कारवाया करण्यात आल्या होत्या.श्री.गजानन शेळके यांनी या विभागाचा पदभार स्विकारल्यापासुन बर्याच यशस्वी कारवाया झाल्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला.काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत,अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.लोकांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची माहीती व जनजागृती व्हावी यासाठी या सप्ताहाअंतर्गत जनजागृती अभियान सुरु आहे.

या जनजागृती संचामध्ये पुरुषोत्तम कलापथक संच अडोळी सोबत पोलिस ऊपअधिक्षक श्री.गजानन शेळके,पो.नि.कांबळे,एएसआय दिलीप बेलोकार,,पोहेकाॅ.विनोद अवघडे आदी महत्वाची भुमिका बजावत असुन मालेगाव तालुक्यापासुन जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे.या सप्ताहाअंतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ही जनजागृती करन्यात येणार आहे.सरकारी काम करण्यासाठी कुणी लाच मागत असेल तर पोलीस उपअधीक्षक श्री.गजानन शेळके ला.प्र.वि वाशिम कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम दुरध्वनी क्र.07252 235933, टोल फ्री क्र.1064 येथे संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस ऊपअधिक्षक श्री.गजानन शेळके ला.प्र.वि.यांनी केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206