या मागणीसाठी चिंचोली मोराची येथील नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे १५ डिसेंबरला उपोषण
पुणे : चिंचोली मोराची ता.शिरूर येथील २००९ पासून बंद पडलेले पर्यटन केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे पदाधिकारी ग्रामस्थांसहीत १५ डिसेंबर २०२२ रोजी उपोषण करणार आहेत अशी माहिती नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा अक्षताताई उकिर्डे, कार्याध्यक्ष संतोष उकिर्डे,सचिव पोपट उकिर्डे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, शेतीसाठी तसेच मोरांच्या तसेच ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी गणेगाव येथील कॅनॉलवरून पाणीपुरवठा करण्यात यावा, मोरांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी योग्य उपाययोजना त्वरीत करणे याबाबत शासनाने मयूर समिती नेमावी, २००९ सालापासून बंद असलेले एम टी डी सी चे पर्यटन केंद्र दुरूस्ती व निधी देवून ताबडत़ब चालू करण्यात यावे, गावामध्ये गायरान हद्दीमध्ये उभ्या असलेल्या घरांच्या नोंदणी सरकारच्या नवीन नियमानूसार,नियमावलीनुसार करण्यात याव्यात, गावामध्ये गावाच्या मालकीचे जे रिकामे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सामाजिक वनीकरण मार्फत वृक्ष लागवड करण्यात यावी, चिंचोली मोराची गावामध्ये पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांसाठी गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये विचारविनिमय करून कर आकारणी करून त्या कराचा उपयोग गावाच्या विकासासाठी करण्यात यावा, गावामध्ये प्रत्येक घराला घरपोच पिण्यास पाण्याचे कनेक्शन देण्यात यावे, गावामधील अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था ,शेतीसाठी जाणा-या रस्त्यांची झालेली दुरवस्था यावर चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यात यावा, गावांमध्ये असणारी धार्मिक स्थळे मंदीर, स्मशानभूमी यांची नोंदणी झालेली नसून त्यांची नोंदणी करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. १५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणा-या उपोषणास चिंचोली मोराची ग्रामपंचायतीने विशेष सभा घेवून जाहिरपणे पाठिंबा द्यावा अशीही मागणी नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष संतोष उकिर्डे यांनी केली आहे.