अतिक्रमणधारकांचे लोकप्रतिनिधीला साकडे
प्रतिनिधी । पुसद
शहरातील मुख्य रस्त्यावर व शहरातील अंतर्गत रस्त्यासह शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण धोकादायक ठरू लागले आहे. अतिक्रमणामुळे अनेकांना जीव गमवावा देखील लागला आहे. नगरपालिकेमार्फत लाखो रुपये खर्च करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविल्या जात आहे.परंतु अतिक्रमण काढू नका यासाठी अतिक्रमणधारकाकडून लोकप्रतिनिधीला साकडे घातल्या जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी कडुनच अतिक्रमणाला पाठबळ मिळत असल्याने लोकप्रतिनिधी आपले मतदारसंघातील अतिक्रमण धारकाची मते फुटू नये यासाठी न.प.चे मुख्याधिकाऱ्यावर दबाव टाकल्या जात आहे. अतिक्रमणामुळे आणखीन जीव गेला तरी चालेल पण अतिक्रमण हटवू नका अशी तंबी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांना दिल्या जात आहे.
शहर व अंतर्गत रस्ते तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गावर करण्यात आलेले अतिक्रमण धोकादायक ठरू लागले आहे. नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले होते.त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे.विक्रेत्यांसह शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीला येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.बस स्थानक समोरील फुटपाथवर अतिक्रमण केलेले आहे.तर गांधी चौक,डॉ. आंबेडकर, सुभाष चौक,नगीना चौक, मुख्य बाजारपेठेसह फुले चौकात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.तर टिळक स्मारक समोर तर एक खिचडी विक्रेता तर रस्त्यावरच अतिक्रमण करून खिचडीच्या गाडा लावून मुख्य रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण करत आहे.महसुल मिळते म्हणून त्या खिचडी विक्रेत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही.शहरात वारंवार होत असलेल्या अपघातानंतर रस्त्यावर करण्यात येणाऱ्या धोकादायक अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
शहरातील अतिक्रमण हटवून रस्त्याने मोकळा श्वास घ्यावा यासाठी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ.सुकलवाड हे गेल्या दहा दिवसापासून लाखों रुपये खर्च करून अतिक्रमण मोहीम राबवत आहे. परंतु अतिक्रमण हटविल्यामुळे अतिक्रमण धारकावर उपासमारीच्या वेळ आल्याच्या बोंबा ऐकावयास मिळत आहे.हे खरे असले तरी शहरातील अतिक्रमणामुळे लोकांचा जीव जात आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही.अतिक्रमण धारकांनी लोकप्रतिनिधीला साकडे घातल्याने अतिक्रमण काढू नका यासाठी मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिल्याने अतिक्रमण मोहीम सध्या थंड बसत्यात आले आहे.यामुळे पुन्हा एकदा शहरातील मुख्य रस्त्यावरील व अंतर्गत प्रमुख मार्गांवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्रास अतिक्रमण करण्यात येत आहे.या अतिक्रमणामुळे रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यावरून दुचाकी चालवताना सुद्धा वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खरेदी करणारे ग्राहकांना गाडीचा धक्का लागल्यामुळे वाद सुद्धा येथे होताना दिसतात. येथील अतिक्रमण काढण्याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत असुन अतिक्रमण धारकाचे मतदान कमी होऊ नये व मतदाराचे अतिक्रमण काढल्यास मतदाराची नाराजी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे नगरपालिकेने लाख रुपये खर्च केलेले पाण्यात गेल्याची वास्तव या निमित्ताने समोर येत आहे.
बॉक्स
अतिक्रमण थंडबस्त्यात झाल्याने परिस्थिती जैसे थे
बसस्थानकाच्या बाहेर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागात वाहतूक पोलिस व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करीत खाद्यपदार्थ,पान टपरी,फळ विक्रेत्यांच्या गाड्या हटवल्या होत्या.परंतु आता पुन्हा येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण होऊ लागले असून पुन्हा कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.सोबतच वाशिम महामार्गासह दिग्रस महामार्ग, उमरखेड महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. मात्र, धोकादायक ठरणाऱ्या या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे.
कोट बॉक्स १
नगरपालिकेने अतिक्रमण हटविण्याचे काम करावे
शहरातील अतिक्रमण काढू नका असे माझे सांगणे असले तरी, नगरपालिका प्रशासनाने कायद्यानुसार कारवाई करावी. कायद्यानुसार कारवाई करण्याला माझा विरोध नाही. अतिक्रमणधारक माझ्याकडे येत असेल तर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. अतिक्रमणधारकाच्या समस्या ऐकून त्यांचे समाधान करण्याचे ते माझे कामच आहे.परंतु शहरातील अतिक्रमामुळे अपघाताचे होत असेल तर नगरपालिकेने अतिक्रमण काढावे त्यांना कोणीही अडविणार नाही.-इंद्रनील नाईक,आमदार पुसद मतदारसंघ.
कोट बॉक्स २
नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करावी
अतिक्रमणधारक माझ्याकडे येत असून त्यांचे समाधान करणे हे माझे काम आहे.अतिक्रमण धारकांनी केलेले अतिक्रमण काढण्याला माझे समर्थन आहे. परंतु अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकांना पर्याय जागेची व्यवस्था नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावे. माझ्या डोक्यामध्ये दोन-तीन प्लॅन असून त्या संदर्भात मी चर्चा करणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणधारक फळ विक्रेत्यांना शहर पोलीस स्टेशन समोरील बांधलेल्या व्यापारी संकुलनात जागा उपलब्ध करून द्यावी. ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नगरपालिकेने खुल्या जागेची व्यवस्था करावी.-ययाती नाईक,माजी जि.प.उपाध्यक्ष.
[4:58 pm, 08/12/2022] Ntv Big Boss: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹