वाशिम:- वाशिम येथील एका नामांकित डाॅक्टरच्या दवाखान्यातिल कंपाऊंडर ते ऊत्तरप्रदेशातुन डाॅक्टरकीची पदवी घेवुन मंगरुळपीर तालुक्यात ‘त्या’ झोलाछाप मुन्नाभाईने आपले बस्तान बसवले आहे.सोबतच अनधिकृत लॅब थाटुन त्याव्दारेही रूग्नांची लूट चालवली अशी चर्चा होत आहे.अशा झोलाछापच्या शासनाने आता समाचार घेवून डिग्री आणी सबंधित दस्तएवजांची पडताळणी करणे गरजेची असल्याची मागणी जोर धरत आहे.
कुणीबी यावे,अन टिकला मारावे…..या गिताप्रमाणे मंगरुळपीर,शेलुबाजार आणी वाशिम जिल्ह्यातील विविध ठिकाणी बोगस डिग्र्या पैशाच्या जोरावर मिळवून आरोग्य क्षेञात बर्याच झोलाछाप मुन्नाभाईंनी आपापले दुकान थाटले.या दवाखाना नावाच्या दुकानाच्या माध्यमातुन अवैध लॅब,जवळच्या मेडीकलशी साटेलोटे आणी ऊपचाराची गरज दाखवुन सामुहिक रूग्नांची आर्थीक लूट करुन, पैशासाठी प्रसंगी चुकीचा ऊपचार करुन रूग्नांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार परिसरात सर्रास चाललेला असल्याची चर्चा आहे.कुठुनतरी डाॅक्टरी पेशातल्या डिग्र्या मिळवायचे आणी बिनधास्त स्वतःच्या नावापुढे डाॅक्टर पदवी लावून बोर्ड लावून दुकान थाटायचे असा काहीसा हा प्रकार दिसत आहे.डाॅक्टरी पेशात अनेक नामांकित काॅलेज/विद्यापिठ असुन काही बहाद्दरांनी माञ थेट ऊत्तरप्रदेशातुन डिग्री मिळवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.विशेष बाब म्हणजे सदर विद्यापिठाची वेबसाईडही आहे व त्यामध्ये सबंधितांचा रजिष्टर नंबर टाकला की मार्कसिटही दिसते.त्यामुळे प्रशासनाने आता अशा डिग्र्यांचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे बनले आहे.खरच ते विद्यापिठ आहे का,सदर वेबसाईड खरी आहे का?महाराष्टात अशा पदविला मान्यता आहे का?त्या विद्यापिठ आणी पदविलाशासनाची मान्यता आहे का?ती डिग्री खरी की खोटी?अशा बाबींचा ऊलगडा होणे महत्वाचे आहे अशी मागणी जनमाणसांमधून होत आहे.शासनाने वेळीच झोलाछाप मुन्नाभाईंवर अंकुश न लावल्यास रूग्नांची अशीच आर्थीक लुट होत राहिल आणी अनेकांचे चुकीच्या माणसाच्या तावडीत सापडुन,चुकीचा ऊपचार केल्यामुळे जीवही जातील अशी खंत व्यक्त होतांना दिसत आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी हे प्रकरण गंभीरतेने घ्यावे व जील्ह्यातील लॅब,दवाखाने,मेडीकल यांच्या कागदपञांची पडताळणी करुन झोलाछापवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हावाशीयांमधून होत आहे.
झोलाछाप मुन्नाभाईंनाहद्दपार करण्याची गरज
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये असलेल्या शेलुबाजार येथे तब्बल ०८ संशयीत बोगस झोलाछाप मुन्नाभाई असल्याचे खुद्द डाॅक्टर अशोसिएशननेच प्रशासनाकडे नाव आणी लोकेशनसह यादी आणी यासंदर्भात तक्रार देवुनही थातुरमातुर कारवाई माञ एकावरच केल्याची आणी बाकीच्यांना माञ मोकाटच का सोडले? याविषयी प्रशासनासह नागरीकांच्याही मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन यासंदर्भात परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.विश्वसनिय सुञाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार डाॅक्टर अशोसिएशनने जिल्हाधिकारी यांचेसह सर्व संबधित प्रशासकीय यंञणांना तब्बल ०८ संशयीत बोगस झोलाछाप मुन्नाभाईची यादी तक्रारीसह सादर केली होती.वाशिमचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी झोलाछाप डाॅक्टरांच्या वारंवार येणार्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेवुन जिल्ह्यातील मुन्नाभाईंवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत तसेच भरारी पथके नियुक्त करुन अधिकृत आणी अनधिकृत दवाखाने,लॅबची माहीती मागवुन धाडसञ सुरु केले.शेलुबाजार येथील एका झोलाछापवर पथकाने कारवाई माञ केली परंतु तेथिल लॅबसंदर्भात मौन का बाळगले? सबंधित डाॅक्टरचा रजिष्टर नंबर तपासला का?तेथिल मेडीकलचे लायसन कुणाचे व ते स्वतः हजर होते का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच ठेवुन कारवाई केली त्यामुळे ऊलटसुलट चर्चेला ऊधान आले.
जिल्हाधिकारी यांनी बोगस डाॅक्टरप्रकरणात गंभीरतेने दखल घेण्याचीही मागणी होत आहे.खुद्द डाॅक्टर अशोशियेशननेच शेलुबाजार येथील ०८ बोगस डाॅक्टरांची यादी लोकेशनसह देवुनही चौकशी करुन कारवाई का होत नाही?हा नागरीकांना माञ प्रश्न पडला आहे.एकट्या शेलुबाजारमध्ये ०८ बोगस डाॅक्टर जर असतील तर मंगरुळपीर शहरासह खेडोपाड्यातही असे झोलाछाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाच्या सुचनेनुसार सर्व डाॅक्टरांचे कागदपञे मागवली होती.दुसर्याच्या नावे असलेल्या रजिष्टर नंबरचा गैरफायदा घेणारा प्रकार शेलुबाजारमध्येच पुढे आल्याने इतरांनी जमा केलेली दवाखान्या संदर्भातली कागदपञे,रजिष्टर नंबर,लॅबच्या परवानगीचे सर्टिफिकेट व अन्य आवश्यक कागदपञे काहिंनी बोगस जोडली नसतील कशावरुन?त्यामुळे सर्वांच्या दस्तएवजाचीही व्हेरीफिकेशन(पडताळणी) होणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने अधोरेखीत होत आहे.भरारी पथक स्थानिक हितसबंध जोपासुन अनधिकृत डाॅक्टर आणी लॅबवर जर कारवाई करत नसतील तर वाशिमच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी आता कारवाईचे सुञ स्वतःकडे घेवुन अशा बोगस झोलाछापवर धाडसञ सुरु करावे अशी मागणी आता जनतेमधुन होत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206