नागपूर विधान भवनावर २७ ला धडकणार पेन्शन संकल्पयात्रा -जिल्हाध्यक्ष कानडे
वाशिम: ०१नोंव्हेंबर २००५नंतर शासकिय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने येत्या २५ ते२७डिसेंबर २०२२रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर लाखो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शन संकल्प पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २५डिसेंबर ला सेवाग्राम ते बुटीबोरी पेन्शन बाईक यात्रा,२६ डिसेंबर ला पेन्शन स़कल्प पदयात्रा,बुटीबोरी ते समाज भवन खापरी आणि २७ ला समाजभवन खापरी ते नागपुर विधान भवन अशी तीन दिवस पेन्शन संकल्प पदयात्रेचं आयोजन करण्यात आले आहे,यात राज्यभरातुन लाखो कर्मचारी तर वाशिम जिल्ह्यातुन शेकडो कर्मचारी सहभागी होणार असल्याचे माहिती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष निलेश कानडे यांनी दिली
आता महाराष्ट्रातील लाखो कर्मचाऱ्यांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव झाली आहे,किती दिवस हा अन्याय सहन करायचा?या अन्यायाला वाट मोकळी करून द्यावीच लागणार आहे.जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे ठोस आश्वासन देईल त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.
“जो देईल पेन्शन,त्यालाच देऊ समर्थन”या नवीन घोषणेसह नागपुर विधान भवनावर येत्या २७ डिसेंबरला राज्यातील लाखो कर्मचारी धडकणार आहेत.राजस्थान छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू झाली. मग प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना का लागु होत नाही? ज्या नवीन पेन्शन योजनेचा शासनाकडून चांगली म्हणुन ढिंडोरा पिटला जातो ,ती योजना आमदार खासदारांना का लागु नाही?-बालाजी मोटे
नवीन पेन्शन योजना ही फसवी असुन शेअर मार्केट वर आधारीत योजना आहे.मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आज वाऱ्यावर आहेत,त्यांना न्याय कधी मिळणार?त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवली आहे- गोपाल लोखंडे
नवीन पेन्शन योजनेत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य सुरक्षित नसल्याने लाखो कर्मचारी अस्वस्थ आहेत.जे कर्मचारी बांधव मयत झाले त्यांना शासनाचा कोणताही लाभ या नवीन पेन्शन योजनेत मिळाला नाही.वेळोवेळी आंदोलने ,विनंती करूनही शासन दखल घेत नाही ही भावना आहे ,म्हणुन हिमाचल प्रदेश मध्ये तेथील कर्मचाऱ्यांनी जी भुमिका घेतली आणि नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली,तीच भुमिका नागपुर हिवाळी अधिवेशनावर पेन्शनमार्च काढुन महाराष्ट्रातील कर्मचारी घेणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. वाशिम जिल्ह्यातुन जास्तीत जास्त संख्येने डीसीपीएस एनपीएस धारक उपस्थित रहावेत यासाठी बालाजी मोटे, गोपाल लोखंडे,अनिल मडके, विनोद काळबांडे,मीनाक्षी नागराळे,सज्जन हेंदरे,संजय बेंद्रे,किशोर कांबळे,अर्जुन लोंढे,कैलास वानखेडे,ईश्वर तरडे,अमर शिंदे, हरिदास मते, संदिप देशमुख,रवि ठाकरे ,राजेश मोरे,भाऊराव तनपुरे,निलेश मिसाळ,संतोष गुल्हाने,अमोल बोडखे, बालाजी फताटे,सुनिता सावके,हर्षा गजभिये,लता बुंदे,सोनल काकड,अनुप डहाके,श्रीपाद शिंदे ,हरिष चौधरी,संतोष इंगळे, संदिप ढोरे,गणेश राऊत,गोविंद पोतदार,निलेश मोरे, संदिप सावळे संघटनेचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206