नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाघी ग्रामपंचायतीच्या सर्व शिष्टमंडळांनी मागील काही दिवसापूर्वी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे गावात व तालुक्यात पसरत असलेल्या डेंगू सदृश्य परिस्थितीवर चर्चा करून गावात धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी केली होती त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब यांना फोन करून संबंधित आरोग्य विभाग यांना आदेशित केले होते की वाघी ग्रामपंचायत मध्ये तात्काळ धूर फवारणी करण्यात यावी त्या मागणीची तात्काळ दखल घेऊन हिमायतनगर येथील आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदेश पोहरे यांनी दि. 26 ऑगस्ट रोजी वाघी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांच्या उपस्थित गावात धूर फवारणी करण्यास सुरुवात केली आहे
तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिवताप, डेंग्यू ,मरेरिया ,ताप अशा आजाराने थैमान घातले आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी मागील काही दिवसापूर्वी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर साहेब यांची भेट घेऊन हदगाव सह हिमायतनगर तालुक्यातील सर्व गावांना धुर फवारणी करा अश्या सुचना दिल्या होत्या त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत वाघी येथून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक मशीन ने संपूर्ण गावात धूर फवारणीला सरपंच व उपसरपंच यांच्या उपस्थितीत सुरुवात केली गेली.