अहमदनगर : अहदनगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडून आज दि.१५ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. महाराष्ट्र शासन राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ सन १९९५ मध्ये रुजू झाले असून सिंधुदुर्गमध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले. कोकण विभागात कणकवली, सावंतवाडी, जव्हार, पालघर येथेही उपविभागीय अधिकारी पदाची धुरा सांभाळली आहे. श्री. सालीमठ यांनी सोलापूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. श्री. सालीमठ यांनी मंत्रालयातील नगरविकास विभाग, महसूल विभागमध्येही जबाबदारी सांभाळन्याबरोबरच कोकण विभागाचे महसूल उपायुक्त म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिले. भारतीय प्रशासकीय सेवेत सन २०२० मध्ये निवड झाल्यावर प्रथम ते पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

अहमदनगर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून आज (ता.१५) पदाची सूत्रे स्वीकारली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न
अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा आहे. धार्मिक पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. आगामी काळामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांना बरोबर घेऊन, जिल्हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कशा पद्धतीने येईल, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.