section and everything up until
* * @package Newsup */?> आकाश प्रकाश संगत यांच्या पुढाकारातुन वार्डाचा होणार कायापालट | Ntv News Marathi

मंगरुळपीर शहरात आमदार निधीतुन कोट्यावधींचे विकासकामे कामे सुरु

वाशिम:-मंगरुळपीर नगर परिषदेअंतर्गत अडिच कोटींचे विविध विकासकामे लोकप्रीय आमदार लखन मलिक यांच्या निधीतुन सुरु आहेत.नगरसेवक आकाश प्रकाश संगत यांच्या पुढाकारातुन वार्ड नं.७ मध्येही रस्ते बांधनिस सुरुवात झाल्याने आता तो वार्ड चकाकणार आहे.


वार्डातील लोकांनी विश्वासाने नगरसेवक बनवून आशीर्वाद रुपी विश्वास दाखवला आहे.तो विश्वास सार्थकी लागावा आणी आपल्या हातुन लोकहितांची कामे व्हावित यासाठी नेहमी प्रयत्नशिल असणारे आकाश प्रकाश संगत यांच्या प्रभाग क्र.७ मध्ये वाशिम मंगरुळपीरचे लोकप्रीय आमदार लखन मलिक यांच्या निधीतुन कामे सुरु केली आहेत.यामध्ये दलितवस्तीमध्ये ३५ लाख रुपयाचे हायमाष्ट लाइट,सुखाडीया यांच्या घरामागील रस्ता ते शिव स्टील फर्निचर पर्यत ३५ लक्ष रुपयाचा रोड,अशोकभाऊ परळीकर यांचे अपार्टमेंट ते छञपती शिवाजी महाराज तैलचिञ पर्यतचा रस्ता ८० लाख रुपये,दत्त मंदिर परिसरातील कंपाऊंडवाॅल व पेवरब्लाॅक ६० लक्ष रुपये,जय गुरुदेव सभागृह परिसरात पेवरब्लाॅक ३० लक्ष रुपये.अशाप्रकारे कामे सुरु झालेली असल्याचे सांगीतले.त्याच प्रभाग ७ मध्ये सध्या ८० लाख रुपये निधीचे कामे सुरु आहेत व ते एका महिन्यात पुर्ण होतील असे दिसते.गणेश मंदीर सभागृह डागडुजी ४० लक्ष रुपये असे एकुन ७ कोटींची कामे आहेत.सध्या अडिच कोटींची कामे सुरु असुन आमदार लखन मलिक यांनी अजुन पुढे मंगरुळपीर शहर विकासासाठी ५ कोटी रुपये निधीची कामे प्रस्तावित केली आहे.एवढ्या मोठ्या भरगोस निधीतील कामामुळे शहराचा कायापालट होवुन विकास होणार असल्याने शहरवाशी आनंदात आहेत.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *