मंगरुळपीर:-तालुक्यातील पिंपळखुटा संगम तसेच मंगरुळपीर शहरातील संभाजी मिञ मंडळातील शिवभक्तांनी पिंपळखुटा ते मंगरुळपीर अशी कावड याञा काढून परिसर शिवजींच्या हर हर महादेव या गजराने भक्तीमय झाला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंगरुळपीर शहरातील शिवमंदीर येथील संभाजी मिञमंडळातील सदस्य तसेच पिंपळखुटा संगम येथील संत भायजी महाराज व श्री.महादेव संस्थानातील शिवभक्तांनी मिळुन पिंपळखुटा ते मंगरुळपीर अशी शिवजींची कावडयाञा मोठ्या ऊत्साहात काढली.शिवभक्तांच्या हर हर महादेवच्या गजराने परिसर भक्तीमय बनला होता.या कावड याञेची सांगता मंगरुळपीर शहरालगतच्या शिवमंदिरात करन्यात आली.या कावड याञेत शेकडो शिवभक्तांनी ऊत्फुर्तपणे सहभाग नोंदवत भक्तीभावाने कावड याञा संपन्न झाली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206