उमरखेड ;(शहर प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाच्या संलग्न असलेल्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या प्रदेश महासचिव पदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे बेलखेडकर यांची निवड करण्यात आली असून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून जनहिताचे कार्य करीत काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या साहेबराव कांबळे यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी साहेबराव कांबळे बेलखेडकर यांची नियुक्ती केली आहे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांच्या झालेल्या नियुक्तीमुळे सबंध उमरखेड तालुक्यातील काँग्रेस गटात नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत असून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विविध स्तरातून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी आपल्या निवडीचे श्रेय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण संजय ठाकरे यांना दिले आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *