पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्लाह दर्गा परिसरात असलेल्या मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महानगरपालिका करणार असलेल्या कारवाईबाबत चुकीची माहिती देवुन (अफवा पसरवून) मुस्लिम समाजाकडून अपराध घडवा या हेतूने चिथावणी देवून दोन समाजामध्ये शत्रुत्व व तेढ निर्माण होईल अशी कृती करून गैरकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी 21 जणांसह इतरांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
चुकीची अफवा शुक्रवारी रात्री पसरवण्यात आली. यानंतर चार ते पाच हजार मुस्लिम बांधव परिसरात जमले. समाजमाध्यमातून अफवा पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. समाजमाध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अजित जाधव करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग रुक्मिणी गलांडे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमलेल्यांना शांत केले केले होते.
अबरार शेख