*उमरखेड तालुक्यातील सुकळी (जहागीर) येथील सय्यद अरर्शीयान सय्यद रहीम रजा वय ६ या चिमुकल्याने आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केल्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याला मंगळवार पासून सुरुवात झाली आहे.या महिन्यात जगभरातील मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजे (उपवास) करतात.उपवास कालावधीतील दोन मुख्य जेवण म्हणजे इफ्तार, जे सूर्यास्तानंतर खाल्ले जाते आणि सेहरी, जे सूर्योदयापूर्वी खाल्ले जाते.इस्लाम धर्मात रमजानचा महिना विशेष मानला जातो.त्याला पाक महिना असेही म्हणतात.
संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची पूजा (इबादत) केली जाते.रमजानचा महिना २९ किंवा ३० दिवसांचा असतो.रोजाची सुरुवात केल्यानंतर शव्वालच्या शेवटच्या तारखेला ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जातो.मुस्लिम धर्माचा प्रत्येक सण चंद्रावर अवलंबून असतो.सोमवारी (ता. 11) चंद्र दिसल्यानंतर मंगळवारी (ता. 12) पहिला रोजा ठेवला गेला.मुस्लिम बांधवांनी रोजे (उपवास) ठेवण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात केली आहे. 10 एप्रिल रोजी ईद-उल-फित्र साजरी होणार आहे.पण, चंद्रदर्शन झाल्यावरच तारीख निश्चित केली जाते.तर मुस्लिम समाजाच्या रमजानच्या महिन्याला इस्लाम धर्मात विशेष महत्व असते.
चौकट
रमजानचे महत्त्व
मुस्लिम समाजातील लोकांसाठी रमजानचे विशेष महत्त्व आहे. हा वर्षातील सर्वांत पवित्र महिन्यांपैकी एक मानला जातो. रमजान महिन्यात प्रत्येकजण अल्लाहची इबादत करतो. दिवसभर रोजा ठेवून सूर्यास्ताच्या वेळी इफ्तारसह रोजा सोडला जातो. महिनाभर कुराण वाचणे चांगले मानले जाते. समाजात सामाजिक एकतेचे दर्शन घडते. उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर येथील (पत्रकार) सय्यद रहीम रजा यांचा मुलगा सय्यद आरर्शीयान रजा वय ६ या चिमुकल्याने अपल्या जिवनातील पहिला उपवास पूर्ण केल्या बद्दल त्याचे परिसरातून कौतुक केले जात आहे व त्याला शुभेच्छा देण्यात येत आहे या वयात अन्न पानी सोडून उपवास ठेवले जात असल्याने कौतुकाची थाप या चिमुकल्याला मिलत आहे.