जुन्या पेन्शन योजनेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा लढा हा सतत चालूच राहील व तो पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मत व्यक्त केले ते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या यवतमाळ जिल्हा अधिवेशनामध्ये बचत भवन येथे बोलत होते.
या जिल्हा अधिवेशनाचे अध्यक्ष माजी आ. व्ही .यु. डायगव्हाणे हे होते. तर उद्घाटक म्हणून आ. सुधाकर आडबाले हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख, माजी विभागीय कार्यवाह एमडी धनरे, उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर, उपाध्यक्ष विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे हे होते तर विशेष उपस्थितीमध्ये विकास टोणे, रमेश जोल्हे, प्रकाश भुमकाळे ,नदीम पटेल हे होते यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक साईनाथ चंदापुरे, संदीप कोल्हे, दीपक पडोळे, सुजित ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना आ. सुधाकर आडबाले यांनी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे. जिल्ह्याच्या कार्यकारिणीने शिक्षणाधिकारी कार्यालयावर वचक ठेवला पाहिजे. 28 ऑगस्ट 2015 चा शासन निर्णय रद्द करावा त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. त्यानंतर आलेले पाच जीआर रद्द झाले आहेत. विद्यार्थी संख्या कमी झाली तर मुख्याध्यापक पद रिक्त करण्याचा नवीन जीआर आलेला आहे तोही रद्द व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यावर पावसाळी अधिवेशनात चिरफाड केली जाईल शासनाला दुरुस्तीचे पत्र काढण्यात भाग पाडू. शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना देणाऱ्या पक्षाला व शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव देणाऱ्या पक्षालाच मतदान करावे असे आव्हानही यावेळी त्यांनी केले. जुन्या पेन्शन ऐवजी आलेल्या जीपीएस हा फसवा अध्यादेश आहे तो आम्हाला मान्य नाही शिक्षकांच्या पुढे T लावण्याचा आग्रह शिक्षकांनी न मागता का शासन करत आहे. शासनाने शिक्षकांना कारकून बनवले आहे. याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्ह्याचे कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे यांनी केले. अध्यक्ष भाषण आपण बोलताना माजी आ.व्हि.यु. डायगव्हाणे यांनी संघटनेच्या कार्यावर सखोल प्रकाश टाकला. यावेळी प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख यांनी संघटना फार मोठ्या प्रगतीपथावर आहे. ज्यांच्यासाठी संघटना लढते तेच लोक अधिक असले पाहिजे निवड श्रेणी, वेतनश्रेणी आम्हाला नको आहे. शिक्षकांना दहा,विस,तिसची वेतनश्रेणी पाहिजे शासनाला ती मान्य करावी लागेल.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पवन बन यांनी केले.
चौकट
मुख्याध्यापकांनी आपल्या खुर्चीची गरिमा राखावी. मला एक वर्ष शिक्षक आमदार होऊन झाले आहे. पण आद्यापली एकाही मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर मी बसलेलो नाही. मुख्याध्यापकाची खुर्ची ही फक्त त्यांच्यासाठीच आहे. इतरांना ती देऊन मोठेपणा करण्याची पद्धत मुख्याध्यापकांनी टाळली पाहिजे.
आ. सुधाकर अडबाले म्हणाले