वाशिम :- मतदान करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्यासह इतर विभाग प्रमुखांनी शहरातील बस स्टॅन्ड पाटणी चौक आणि इतर सार्वजनिक स्थळावर जाऊन मतदारांना पोम्प्लेट/माहितीपत्रक देऊन मतदान करण्याचे आवाहन केले.

शिवाजी चौकातील काही दुकानाच्या बाहेर दरवाजा व भिंतीवर पांम्प्लेट चिकटवण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी बस स्टॅन्ड, पाटणी चौक, रिसोड नाका, शिवाजी चौक आणि बालु चौक परिसरातील लोकांशी संवाद साधला आणि आपल्या मताचा अधिकार बजावण्याबाबत त्यांना आवाहन केले.


यावेळी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, जल जीवन मिशनचे अभय तायडे यांनीही यावेळी मतदार जागृतीचे पत्रक वाटून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *