जामखेड प्रतिनिधी
दि 16 मे

स्वर्गीय ललीता ताई राजेन्द्र बलदोटा यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ आगळा वेगळा उपक्रम सामाजीक बांधीलकीतुन आत्मीक निकट स्नेहबंध जोपासणारा आदर्श सासु सुनेच्या जोडीला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पद्मश्री पोपटपवार साहेब सरपंच आदर्श गाव हिवरे बाजार यांच्या उपस्थितीत
नगर प्रतिनिधी नक्षत्र लॉन आहिल्या नगर येथे आदर्श सासु पुरस्कार सन्मान सोहळा आज साजरा झाला यावेळी सासु सुनेचा पवित्र नात्याला सुवर्णकाळ येत आहे असे प्रतिपाद सौ ललीताताई राजेन्द्र बलदोटा मेमोरियल फाऊंडेशन आयोजीत आदर्श सासु पुरस्कार प्रदान कार्यक्रमामधे प्रमुख पाहुणे पवार साहेबानी वक्त केले
हा नविन्य पूर्ण कार्यक्रम आयोजीत करण्यामागचा उद्देश सामाजीक सलोखा आबादीत राहावा व सासु सुनेचे पवित्र नाते मायलेकी सारखे निखळ व प्रेमळ असावे त्यामधून आपुलकी निर्माण व्हावी यासाठी रोहित बलदोटा यांच्या संकल्पनेतून साकार झाला आलेल्या प्रत्येक ललीताताई व राजेन्द्र यांच्या वैवाहिक जिवनातले किस्से सांगताना अनेकजण भावनिक झाले ब बलदोटा हे संजीवनी एजेंसी (माणिक चौक)चे होलसेल विक्रेता आहेत त्यांच्या सुनबाई सौ प्राजक्ता बलदोटा यांनी या कार्यक्रमा मधून प्रेमाची उज्ज्वल ज्योत प्रज्वलीत केली आहे यासाठी शेकडो नामांकन आले परंतु निवड समिती मधील सदस्य अविनाशजी साळुंके, संजयजी लोढा,अजितजी कर्णावट, अरुणजी दुगड, रोहकले सर, अनिलजी गांधी, संभाजी कदम,समीरजी बोरा, राजेन्द्रजी ताथेड, मनिषजी शिंगवी यांनी तसेच बलदोटा परिवाराने तयार केलेल्या अटी व नियम लक्षात घेऊन खालील 8 सासु मातांची निवड केली.
यामध्ये डॉ. सौ.आशा शिरीषजी कुमठेकर, श्रीमती पुष्पलता सुरेशलालजी कटारिया, शारदा विलास शिंदे, श्रीमती विमलताई झुंबरलालजी ताथेड ,सौ.सुंदरबाई भाऊसाहेब भोगाडे, श्रीमती द्वारकानांनी दशरथ दरेकर, सौ. प्रभावती प्रकाश बिजा श्रीमती लता प्रकाश सुराणा यांचा समावेश करण्यात आला असून आदर्श गावचे सरपंच पद्मभुषण श्री पोपटराव पवार साहेब आणि आमदार श्री संग्राम भैय्या जगताप साहेब वर्तमान विधान सभा सदस्य यांच्या हस्ते सर्व मातांना आदर्श सासू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अविनाशजी भारती यांचे सुंदर असे व्याख्यान झाले श्री रोहकले सरांनी खूपच मार्मिक गोष्टी जवळून समजून सांगितल्या व राजेंद्र बलदोटा यांच्या कार्याची प्रशंशा केली.
यावेळी डॉ. सुधिरजी तांबे माजी आमदार दादाभाऊ कळमकर माजी आमदार नगरसेवक संभाजी कदम गणेशजी भोसले उपमहापौर दिलीपजी सातपुते शिवसेना प्रमुख नगर, अजीतजी कर्णावट, नगरसेवक परेशजी लोखडे,संजयजी चोपडा, प्रकाशजी भागानगरे,धनंजयजी जाधव, तिरंगा फौंडेशन चे सर्व सदस्य,
तसेच बलदोटा परिवाराचे आप्तेष्ट दिलीपजी, अभयजी, आकाशजी संचेती परिवार पुणे व प्रदीपजी, प्रवीणजी, संतोषजी, दिनेशजी, अशोकजी सुराणा परिवार बार्शी आणि ॲडव्होकेट आणि मेडीकल क्षेत्रातील मित्रमंडळी
श्री सुरेशजी शिंदेसाहेब सेवानिवृत उपजिल्हाअधिकारी जिल्हा सरकारी वकील श्री सतीषजी पाटील अनेक राजकीय सामाजीक विभागातील नामवंत वकील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरर्स मेडीकल स्टोअर्स चालक केमिस्ट असोसीएचे पदाधिकारी उपस्थीत होते आहिल्या नगर शहर व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातुन या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे विषेष कौतुक करण्यात आले शेवटी ॲड सुमतीलाल बलदोटा यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले

नंदु परदेशी
एन टी व्ही न्युज मराठी जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
मो न 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *