फुलचंद भगत
वाशिम:- नागपुर इंण्डेण कार्यालया द्वारे अमरावती-यवतमाळ सेल्स मध्ये 2023-24 या वर्षात सर्वात जास्त प्रधानमंत्री उज्वला गॅस कनेक्शनचे वितरण करणे व विविध ॲक्टीव्हिटीज राबविल्याबद्दल इंडियन ऑयल कार्पोरेशनचा “अवार्ड ऑफ एक्सलंन्स 2023-24 ” हा पुरंस्कार चितलांगे इण्डेण गॅस एजन्सी मंगरुळपीर ला एप्रिल 2024 मध्ये जाहिर झाला होता.हा अवार्ड मंगरुळपीर येथिल कार्यक्रमामध्ये इंडियन ऑयलचे वरिष्ठ अधिकारी नागपुर श्री बिजॉय पाटी विक्री अधिकारी श्री सन्मान सहारे, श्री आकाश आमले यांच्या हस्ते चितलांगे इण्डेण चे संचालक पुरुषोत्तम चितलांगे, सौ.लता चितलांगे यांना प्रदान करण्यात आला.वर्षभर लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन,सेप्टी क्लिनीक,ग्राहक सेवेचे कार्यक्रम चितलांगे इण्डेणच्या वतीने नेहमी राबविल्या जात असतात.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206