खासदार डॉ.सुजय विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांचा पुढाकार!
जनतेला मिळाला मोठा दिलासा
जामखेड : जामखेड तालुक्यात यंदा पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. या संकटाशी सामना करणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे हे मदतीला धावून आले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या पुढाकारातून ‘जामखेड तालुका ग्रामविकास फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील सर्व गावे, वाड्या वस्त्यांसाठी 115 टँकरने रोज 206 खेपांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, अशी माहिती भाजपचे जामखेड तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जामखेड हा अवर्षण प्रवण क्षेत्रात येणारा तालुका आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मागील वर्षी तालुक्यात कमी पाऊस पडला होता. जानेवारी महिन्यापासून तालुक्यातील जलसाठे आटू लागले होते. मार्चनंतर तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली. यंदा दुष्काळाशी सामना करणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ‘जामखेड तालुका ग्रामविकास फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमांतून जामखेड शहरासह तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मागेल त्याला मुबलक पाणी दिले जात आहे.
दुष्काळाशी सामना करणाऱ्या जामखेड तालुक्यातील जनतेसाठी ‘जामखेड तालुका ग्रामविकास फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील सर्व गावे, वाड्या वस्त्यांसाठी 115 टँकरने रोज 206 खेपांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या महिला वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार डॉ.सुजय विखे-पाटील व आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून तालुक्यात जनतेसाठी सुरु असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे, असे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद म्हणाले.
नंदु परदेशी
एन् टी व्ही न्युज
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124