राज्यात घेतल्या गेलेल्या इयत्ता १२ वी च्या परिक्षेचा आज निकाल लागला असून त्यानुसार जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन संचलित स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेज,(कला व विज्ञान) पाडळी फाटा (जामखेड) व संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज,(विज्ञान) देवदैठणचा विज्ञान शाखेचा १००% निकाल लागला असून विद्यालयाने याही वर्षी १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. तसेच बारावी कला शाखेचाही ९७.५% निकाल लागला आहे. तालुक्यात तसेच जिल्ह्यात संस्थेच्या सर्व शाखेच्या गुणवत्ता व निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
यावेळी बोलताना सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने जिद्दीच्या जोरावर तसेच आई- वडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन केले आहे. यामुळे त्यांचे भविष्य उज्वल होणार आहे. संस्था विद्यार्थ्यांचे हित व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कायम प्रयत्नशील आहेच.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्य यांचे संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
नंदु परदेशी
एन् टी व्ही न्युज
जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर
मो नं 9765886124