section and everything up until
* * @package Newsup */?> फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडणारा आवाज मंगरूळपीर पोलिसांना कधी ऐकु येईल? | Ntv News Marathi

लहान मुले,महिला व वृध्दांना होत असलेल्या बुलेटच्या ञासापासुन वाचवा

मंगरूळपीर शहरवाशीयांची मागणी

वाशिम :- सध्या युवकामध्ये बुलेटचे वेड वाढत आहेत.फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. विशेषत: लहान मुले तसेच वृद्ध आणि महिलांनाही हा त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री फटाके वाजल्याप्रमाणे हे सायलेन्सर आवाज काढतात.पण पोलिसांकडुन आतापर्यत यावर प्रतिबंध घातल्या गेला नाही.पोलिसांना हा फाडफाड आवाज ऐकु येत नाही की यावर दुर्लक्ष करतात हे सध्या न ऊलगडणारे कोडे असल्याचे चिञ आहे.पोलिसांनी आतातरी अशा ञासदायक वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
पोलिसांकडुन फाडफाड आवाज करुन ध्वनीप्रदुषण पसरवणार्‍या बुलेटचा सायलेन्सर काढून घ्यायला हवा.तसेच थेट ध्वनी प्रदूषण होत असल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करायलाहवा त्यामुळे अशा हिरोगीरी करणारावर वचक निर्माण होवुन कायद्याचा धाक समजेल.मागील काही दिवसांपासून बुलेट या दुचाकीचे सायलेन्सर बदलून वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. एक फॅशन म्हणून दुचाकीचालक याकडे पाहतात परंतु याचा ञास लहान मुले,महिला आणी वृध्दांना जास्त तर इतर नागरीकांनाही होतो.

वाहन जप्तीचीही कारवाई आवश्यक

कानठळ्या बसणार्‍या बुलेट व वाहणावर पहिल्यांचा कारवाई करुनही दुसऱ्यांदा ज्यांच्यावर कारवाई होत आहे, त्यांच्यावर 279, 290 (सार्वजनिक उपद्रव) आणि वाहनांमध्ये मॉडिफिकेशन या कलमांखाली गुन्हे दाखल करणे आवश्यक बनले आहे.वाहनदेखील जप्त करण्याची प्रक्रिया केली पोलिसांकडून तसेच सबंधित विभागाकडून केली जावी. न्यायालयाकडून मान्यता घेऊन कारवाई केलेले ते वाहन त्याला परत मिळावे,मात्र या सर्वांमध्ये वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अशाप्रकारे सायलेन्सर बदलू नये, ध्वनीप्रदुषण करू नये, असे आवाहन पोलिस आणी आरटिओ विभागाकडून होणेही आवश्यक आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *