वाशिम : – मंगरूळपीर येथील स्थानिक धनगरपुरा यूथे३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्या प्रसंगी गायत्री खोडके,आचल मात्रे,यांनी आपल्या
भाषणातुन अहिल्या होळकर यांचे जीवनशेलीवर प्रकाश टाकत त्यांचे कार्याची सविस्तर माहीती दिली.या कार्यक्रमाच्यावेळी ज्ञानदेव खोडके,गोपाल खोडके,देवानंद राठोड,यशवंत बासोळे,प्रकाश खोडके,गणेश खोडके,विनोद काजळे,पंकज ढोरे,रितेश खोडके,दुर्गा ढोरे,प्रियांशू खोडके,सविता ढोरे माधुरी खोडके,सुनिता ढोरे,ज्योती खोडके,लता टोंचर आदी सह असंख्य नागरिक महीला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संजीव टोंचर यांनी केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206