वाशिम : – दरवर्षी वाढदिवसानिमित्य सामाजिक ऊपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करण्याचे निमित्य याही वर्षी कायम ठेवुन सामाजीक कार्यकर्ते आणी संत गाडगेबाबा बचाव पथक व आपत्ती व्यवस्थापणाचे धडाडीचे कार्यकर्ते असलेले अतुल महादेवराव ऊमाळे यांनी आपल्या लाडक्या कु.अक्षदा ऊमाळे या कन्येचा पाचवा वाढदिवसही लोकोपयोगी व प्रेरणादायी सामाजीक ऊपक्रम राबवुन साजरा केल्यामुळे सर्वञ कौतूक होत आहे.
अतुल ऊमाळे हे सामाजीक कार्यात धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.आपल्या कुटुंबियांनाही सामाजिक कार्याचे बाळकडू मिळावे यासाठी ते मुलीच्या वाढदिवसानिमित्य नेहमी सामाजीक ऊपक्रम राबवत असतात.याआधीही त्यांची कन्या कु.अक्षदा हिच्या वाढदिवसानिमित्य वृध्दाश्रमातील लोकांसाठी आवश्यक त्या वस्तु दान देवुन दातृत्वाचा परिचय दिला.गरीबांना अन्नधान्य,शैक्षणीक साहित्य,वृध्दाश्रमात पंखे,कुलर,कपडे आदी साहित्याचे वितरण केले.मुलीच्या पाचव्या वाढदिवसालाही गावालगत असलेल्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते,ये जा करणारा रस्ता खराब झाला होता त्यामुळे गावकर्यांना मोठा ञास होत होता.किरकोळ अपघातही झाले होते त्यामुळे ऊमाळे यांनी कु.अक्षदाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्य स्वखर्चातुन रोडची दुरुस्ती करुन क्राॅंक्रेटीकरण केले तसेच सध्या ऊन्हामुळे जिवाची लाही लाही होत असल्यामुळे पशुपक्षांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.वाढदिवसाप्रित्यर्थ पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ठिकठिकाणी पाण्याच्या कुंड्याची सोय केली तसेच पक्षांना खाण्यासाठी धान्यही ऊपलब्ध करुन दिले.
या वाढदिवसाच्या प्रेरणादायी राबवलेल्या ऊपक्रमामुळे ऊमाळे परिवाराचे सर्वञ कौतुक होत आहे.या ऊपक्रमासाठी कु.अक्षदा अतुल ऊमाळे,सौ.शारदाताई ऊमाळे,महादेव शिवराम ऊमाळे,सौ.यनुमाबाई ऊमाळे,अतुल ऊमाळे या कुटुंबियांचे मोलाचे सहकार्य मिळाले.ऊपक्रम राबवत असतांना मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथे एक वानर जखमी असुन तडफडत असल्याची माहीती मिळताच संत गाडगेबाबा बचाव पथकाचे अतुल ऊमाळे यांनी लखन खोडे,गोपाल गिर्हे या सहकार्यासह तात्काळ चांभई येथे जावुन सदर जखमी वानराला पकडुन मंगरुळपीर येथील पशुवैद्दकीय दवाखान्यात आणले.वानरावर योग्य तो ऊपचार करुन वनविभागाच्या पुढील देखरेखीसाठी सुपुर्द केले.कोणत्याही आपत्तीप्रसंगी धडाडीने धावुन जाणार्या अतुल ऊमाळेचे कौतुक होत आहे.हाच सामाजीक कामाचा वारसा कुटुंबियांनीही जपावा हा त्यांचा ध्यास असतो त्यामुळे दरवर्षी ते मुलीचा वाढदिवस सामाजिक कार्याव्दारे साजरा करतात.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206