section and everything up until
* * @package Newsup */?> वादळी वाऱ्यासह पाऊस:घराचे छत 300 फूट लांब उडाले, झाडी बुडासह उन्मळून पडली तर घरातील शेतीमालासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान | Ntv News Marathi

धाराशिव: उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील अंकुश बालकुंदे या शेतकऱ्याच्या आयुष्यात दि 25 मे हा मोठा घातवार ठरला असून मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. सायंकाळी पाच-साडे पाचच्या सुमारास वादळी वऱ्यांसाह आलेल्या पावसाने पूर्ण संसार उध्वस्त करून टाकले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हटल्याप्रमाणे आधीच दुष्काळात कसे बसे जिवन व्यतीत करणाऱ्या शेतकऱ्याला एवढा मोठा आर्थिक फटका असहनिय असणार आहे. जवळपास तीनशे पत्र्यांचे असलेले हे घर, मजबूत लोखंडी रॉड व कैची ने बांधनी असलेली जवळपास 200 पत्रे हवेत उडाली व शेजारी असलेली दोन आंबा व तीन सागवानची मोठी झाडी बुडासकट उन्मळून पडली आहेत अशी माहिती स्वतः शेतकरी अंकुश बालकुंदे यांनी दिली आहे. दरम्यान घरात ठेवलेली धाण्याची व खताची पोते पूर्णपणे भिजली असून संसारोपयोगी सर्व साहित्याची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.पण या वावटळ ने अख्ख संसार चक्राकार फिरवत शेतकऱ्याचे जिवन मोठ्या चक्रात अडकविले आहे. या वादळाची तीव्रता इतकी मोठी होती की अक्षरशः घराचे छत(पत्रे)300 फूट दूर पडली आहेत.
     उमरगा तहसील प्रशासन तत्परतेने संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.या बाबत उमरगा तहसीलदार गोविंद येरमे यांना एन टी व्ही ने संपर्क साधून माहिती दिली असता पंचनामे करून पिडीत शेतकऱ्यांना शासकीय मदत केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सचिन बिद्री : उमरगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *