section and everything up until
* * @package Newsup */?> उमरगा सकल मराठा समाजाचे जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देत विवीध मागण्यासाठी निवेदन | Ntv News Marathi

उमरगा : उमरगा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना ओ.बी.सी. प्रवर्गातून ५०% च्या आत शाश्वत आरक्षण मिळावे या मागणीसाठी दि .८ रोजी पासून चालू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व अन्य मागण्यासाठी दि .१३ रोजी तहसीलदार गोविंद येरमे यांना निवेदन देण्यात आले .
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की श्री. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना ओ.बी.सी. प्रवर्गातून ५०% च्या आत शाश्वत आरक्षण मिळावे या मागणीसाठी दिनांक ०८/०६/२०२४ पासून आमरण उपोषण करीत आहेत. त्या उपोषनास पाठींबा सकल मराठा समाज उमरगा तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे. कृपया निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागण्या मान्य करण्यात यावे. यासाठी या पत्राद्वारे आम्ही विनंती करत आहोत. ‘जर जरांगे पाटील यांचे उपोषण चालुच राहिले व शासन उपोषण सोडण्याचा प्रयत्न करत नसेल तर मराठ्याद्वारे प्रत्येक गावात उपोषण चालु करण्यात येणार आहे. तसेच मराठ्यांच्या मुलांवर झालेले खोटे गुन्हेही ताबडतोब मागे घ्यावेत अशी मागणी तमाम मराठा समाज उमरगा तालुका च्या वतीने करण्यात आली आहे .
या निवेदनावर शांतकुमार मोरे , किरण गायकवाड, बाबुराव शहापुरे, अमोल पाटील, विष्णू भगत, सुभाष गायकवाड, मोहन जाधव, बापु बिराजदार ,शहाजी येळीकर, अण्णासाहेब पवार ,विजयकुमार नागणे ,विलास व्हटकर, मनोज जाधव ,अरुण जगताप, रामेश्वर सूर्यवंशी ,मंगेश भोसले, संदीप पाटील ,बाळासाहेब मोरे, उद्धव मुळे, खंडेराव औरादे, रोहित पवार, ज्योतिबा शिरगुरे ,अभिषेक औरादे ,गोविंद गाडवे ,दयानंद माने, किशोर शिंदे ,शंकर सूर्यवंशी, विशाल माने ,विकास जाधव ,मनोजकुमार जाधव , विठ्ठल पाटील, हरिभाऊ माने ,शरद पवार ,संजय माने, बाबा पवार, योगेश तपसाळे यांच्यासह मराठा बांधवांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *