section and everything up until
* * @package Newsup */?> सावधान..काही क्षणात करोडपती व्हा..! जाहिरातीचा भडीमार. | Ntv News Marathi

टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहे लूट..

~ सचिन बिद्री

धाराशिव : आजच्या या डिजिटल काळात चोऱ्या अन् लूट सुद्धा अगदी डिजिटल बनले असून उघडपणे सर्वांच्या डोळ्यादेखत ह्या चोऱ्या होत आहेत त्यामुळे पालकांची धास्ती अधिक वाढली आहे. कारण पाल्य, विद्यार्थिदशेत किंबहुना अगदी सातवी आठवीचे मुलेही अल्पवाधित करोडपती बनण्याच्या अमिषाला बळी पडून आपली पुंजी गमावत आहेत.यामुळे वेळीच सावध होणे आणि अश्या बनावट जाहिरातीचा वापर करून सर्वासामान्य जनतेला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करनं आवश्यक ठरतं.
            ड्रीम इलेव्हन वर टीम बनवा करोडपती व्हा… तीन पत्ती खेळा लाखो करोडो जिंका आता तर नवीनच खेळ आला आहे तो म्हणजे एलीव्हेटर…!एक अप्लिकेशन अंतर्गत विमान उडवून काही क्षणात पैसे डबल(मल्टीपल)करण्याचा असा हा खेळ असल्याबाबत जाहिराती पहावयास भेटत आहेत.लोकं मोठ्या प्रमाणावर याला डाऊनलोड करून वापर करत आहेत, पण लक्षात ठेवा अप्लिकेशन बनविणाऱ्या मालकाला किती लोकांनी एकूण किती रक्कम लावली आहे.? हे सर्व दिसत असतं त्यामुळे तो त्याच्या मर्जीने हा विमान उडवितो आणि खेळणारे सर्वासामान्य जनता मात्र याच्या आहारी जाते आणि गेलेले पैसे काढण्याच्या जिद्दीने आणखी पैसे लावत पूर्णतः बरबाद होत जाते. त्यामुळे अश्या गेम पासून सावध व्हा.

शत्रू बाहेर नसून तुमच्या घरात आहे..?

विद्यार्थी मित्र मैत्रीनींनो तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर लोटणारा, ध्येयप्राप्तीच्या लक्ष्य पासून विचलित करणारा शत्रू हा बाहेरचा कोणी नसून तुमच्या घरात असणारा मोबाईल आणि टी व्ही चॅनल्स आहेत त्यामुळे विद्यार्थीदशेत असताना या दोन्ही शत्रूपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि पुस्तकाशी मैत्री करा. लक्षात ठेवा हे इतकं सोपं असणार नाही पण आजपासूनचं मोबाईल पासून दूर आणि पुस्तकाशी मैत्रीचा सराव करा नक्की याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.


समाजमाध्यम(सोशल मीडिया)एक दुधारी तलवार..!


   सोशल मीडिया एक अशी तलवार आहे ज्याचा वापर ज्या दृष्टीकोन बाळगून कराल तसें त्याचे परिणाम समोर येतील म्हणुन याला दुधारी तलवार असे म्हणायला हरकत नाही.पण अलीकडे यावर फसव्या जाहिराती सर्वाधिक प्रमाणात समोर येत आहेत आणि दुसरीकडे अगदी लहान वयातच मोबाईलचा वापर वाढलेला दिसून येतोय यामुळे ही एक मोठी चिंताजनक बाब समाजावर ठरत आहे. 

विमान उडवा करोडपती व्हा..?

सोशल मिडीयावर अनेक अश्या फसव्या जाहिराती सुरु आहेत ज्यामुळे अनुभवहीन युवक अश्या जाहिरातीवर विश्वास ठेवतात बिनधास्त अप्लिकेशन डाऊनलोड करून फसतात आणि आलेल्या नैराश्यातुन वाममार्गाला जातात, व्यसनाधीन होतात.विशेष बाब म्हणजे या अश्या अप्लिकेशन डाऊनलोड करा आणि लाखो रुपये कमवा अश्या फसव्या जाहिराती डब केलेल्या आवाजात नामवंत सेलिब्रेटीचे चेहरे दाखवून जाहिराती दाखवल्या जात आहेत. यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी, अनुपम खेर, शाहरुख खान,क्रिकेटर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी अश्या सुप्रसिद्ध व्यक्तींचे चेहरे व हुबेहूब त्यांच्याच आवाजात ही फसवी जाहिराती दाखवली जात आहे. हा मोठा स्कॅम असून केंद्र शासन व राज्य शासन यावर त्वरित कारवाई करणे अश्या जाहिराती पोस्ट करणाऱ्या फेसबुक पेज वर व संबंधित कंपनीच्या मालकावर फसवणूकीच गुन्हा नोंद करून जनजागृती करणे आवश्यक आहे.पण याकडे शासन किंवा प्रशासनाचे काहीच लक्ष नसून अनेक लोक या जाळ्यात अडकत आहेत, शहर, महानगर आता ग्रामीण भागातही अश्या फसव्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपयांचा डाव खेळला जात असून अनेक युवक बरबाद होत आहेत.


शेअर मार्केटची अक्कल नसणारे, लोकांना विकू लागले करोडपती बनविण्याचे स्वप्न..

अल्पवाधित भरमसाठ पैसे कमविता येतात तेही अगदी एका क्लिक वर फक्त तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल वर जुडा आणि आमची फिस भरा, आमच्या टिप्स वर ट्रेड करा म्हणजे तुम्ही करोडपती बनाल अश्या नानाविध जाहिराती गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियावर पहावयास भेटत आहेत. त्यात आवर्जून स्टॉक ऑप्शन आणि इंडेक्स ऑप्शन मध्ये काही मिनिटात करोडपती बनविण्याचे स्वप्न विकताना दिसून येतात. मुळात शेअर मार्केट एक अथांग सागर आहे ज्याचा जेवढा अभ्यास कराल तितके कमीच असतं, फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस करून ट्रेड करायचं असतं तेही रिस्क आणि रिवार्डची तपासणी व फेरतपासनी करून…! जें लोकं दुसऱ्याला करोडपती बनविन्यासाठी स्वतः काही हजार रुपये फिस मागतात मग विचार करा ते स्वतः का करोडपती बनत नाहीत.? शेअर मार्केट मधून अब्जधीश बनलेले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पहिल्या पाच मध्ये ज्यांचे नाव असतें असे वॅरेन बफेट यांनी कधीच लोकांना टिप्स (करोडपती होण्याची स्वप्न) विकत नाहीत,किंवा आपल्या देशातील स्वर्गवासी राकेश झूनझूनवाला यांनीही कधी दुसऱ्याला सांगत बसले नाहीत.लक्षात ठेवा ज्याच्याकडे शेअर मार्केट मध्ये पैसे कमविण्याची अक्कल असते तो दुसऱ्याला कधीच बोंबलत सांगत नाही, स्वतःला अक्कल नाही,उद्योग व्यावसाय करायला भांडवल नाही, कष्ट करण्याची हिम्मत नाही असे फसवे लोकं लोकांना टोप्या घालण्यासाठी सोशलमीडियावर तुम्हाला काही मिनिटात करोडपती बनवू म्हणुन स्पॉन्सर पोस्ट करतात आणि दिवसाधवळ्या सर्वांच्या देखत अर्धवटज्ञानी व निष्पाप लोकांना लूटतात.शेअर म्हणजे काय.? इंडेक्स काय.?निफ्टी, बँकनिफ्टी, मिडकॅप, सेन्सेक्स, फिननिफ्टी, कमोडीटी, फ्युचर आणि ऑप्शन या सर्व बाबी समजून घेऊन सखोल अभ्यास करूनच शेअर मार्केट या व्यवसायात हात घालावा अन्यथा उगीच कोणाचे ऐकून ट्रेडिंग करण्याचे टाळावे.
     एकंदरीत सोशलमीडिया असो वा टी व्ही चॅनल्स ज्या काही जाहिराती लाखो करोडो कमविण्याचे स्वप्न दाखवत जाहिराती करत आहेत यामुळे सर्वासामान्य जनतेला केवळ गंडा बसत आहे, मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. एक प्रकारे अनधिकृत धंदे आता अधिकृत रित्या लोकांना लुटायला सुरु केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा सावधान…!

“बंद झाल्या शिक्षणाच्या जाहिराती,
जुगार प्रसिद्ध झाला.!हिंदी असो वा मराठी फिल्म अभिनेते दररोज म्हणतात जुगार खेळा करोडपती व्हा..!मेरा देश बदल रहा है”

बातमी इतरांना नक्की शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअर मुळे एखादा कुटुंब बरबाद होण्यापासून वाचेल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *