सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांची कौतुकास्पद कामगिरी..
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील
मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, नळदुर्ग पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. मोबाईल फोन सारख्या लहान गोष्टींचा शोध घेण्यास वेळ लागतो. मात्र, नळदुर्ग गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे पोलीस अंमलदार अविनाश दांडेकर या पोलिसांनी 11 मोबाईल परत करण्यात आले..
यावेळी हरवलेले व चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले..
नळदुर्ग परिसरात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी २ ते ३ महिन्यांपूर्वी हरवलेल्या, गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती घेत विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले 11 मोबाईल हस्तगत 15 ते 20 दिवसात केलेCEIR पोर्टलच्या मदतीने व सायबर सेल. गेलेला मोबाईल परत मिळेल,
ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. त्यामुळे हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी नळदुर्ग पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
मोबाईल ही नागरिकांसाठी महत्वाचा विषय असतो. चोरी गेल्याने आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय अनेकांचा महत्वाचा डाटाही जातो. त्यामुळे यासंबंधित नागरिकांच्या भावना वेगळ्या असतात. मोबाईलची कधी चोरी होते, तर कधी हरवतो. पोलिसांकडून दाखला मिळवून नवे सिमकार्ड मिळवून अनेक जण नवा मोबाईल सुरू करतात. असे असले तरी त्यांच्या दृष्टीने हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाईल तेवढाच महत्वाचा असतो. त्याचा शोध घेता येत नाही, तक्रारही नोंदवून घेतली जात नाही, यामुळे पोलिसांबद्दल नागरिकांचे मत खराब होते. तर दुसरीकडे चोरांचे धाडस वाढते. त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे ओळखून पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांनी यासाठी खास मोहीम राबविण्याचे ठरविले. आपल्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांना कामे वाटप केले. तांत्रिक मदत आणि पारंपरिक तपास पद्धतीचा अवंलब करून विशेष मोहिमेत त्यांनी मोबाईल परत मिळविण्यास यश मिळविले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली .
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे . पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे पोलीस अंमलदार अविनाश दांडेकर यांच्या या कामगिरीची कौतुक पोलीस अधीक्षक व नागरिकाकडून करण्यात आले