section and everything up until
* * @package Newsup */?> उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात हवं नवखं आमदार.?,मतदारसंघात कोणाची हवा.?कसा हवा लोकप्रतिनिधी.? | Ntv News Marathi

सचिन बिद्री:उमरगा

आमदार झाल्यावर किती छपाई होऊ शकते.? किती कोटीची मालमत्ता जमा जमा करू शकतो.? कुठले कुठले मार्ग असतात कमवायचे.? लोकांची कशी दिशाभूल करू शकतो.? या प्रश्नाचे ज्याला उत्तरच माहित नाही, किंवा ज्या व्यक्तीला सर्वासामान्य व्यक्ती कधीही कुठेही सहज बोलू शकतो, सहज जाब विचारू शकतो असा एक सर्वसामान्य व्यक्ती उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रात नवखं आमदार,अगदी राजकारण विरहित आणि समाजकारणाशी नाळ असलेला हवं अशी मागणी नागरिकांतुन होत असताना पाहवयास भेटत आहे.
लोकसभा निवडणूकीचा निकाल पाहता मतदारांची काय मनःस्थिती निर्माण झाली आहे आहे हे सर्व राजकारणी लोकांना अवगत झाली आहे. पक्षफोडी, पक्षाशी गद्दारी, जुमलेबाजी, एका हाताने दिल्यासारखं करायचं आणि दुसऱ्या हाताने वरबाडून घ्यायचं हे आता सर्व जनतेला समजलं आहे आणि उमगलं आहे.
उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे गेल्या पंधरा वर्षांपासून म्हणजे तीन टर्म पासून या भागाचा प्रतिनिधीत्व करत आहेत.पहिल्या टर्म मध्ये चौगुले यांना उमरगा लोहारा मतदार संघातील मतदारांनी आपल्या अमूल्य मतदाणासोबत सात रुपये देणगी दिली होती. आम्हला साथ द्या..! पिण्याचे स्वच्छ पाणी, रस्ते, नाली, स्ट्रीट लाईट,मुलांना उत्तम शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून द्या अशी मागणी जनतेतून होती. त्या धर्तीवर सर्वाधिक विकास निधी खेचून आणणारें लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांनी ख्याती मिळवली खरी पण आलेल्या विकास निधीतून काय कामे झाली.?ती कुठल्या दर्जाची झाली.? यावर कोणी बोलत नाही. या विकास निधीतून टक्केवारीचा खेळ मात्र जोरात चालला आणि त्यातून लोकप्रतिनिधी,काही मोजके कॉन्ट्रॅक्टर,काही मोजके कार्यकर्ते लाखो, करोडो रुपये कमवून निघाले याबाबत चर्चा व गप्पा तालुक्यातील गल्लीबोळात रंगाताना दिसून येते.मार्च 2024 च्या कालखंडत उमरगा लोहारा परिसर भीषण पाणी टंचाई दिसून आली. तालुक्यातील नदी,नाले, तळे पूर्ण कोरडे तर जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने बहुतांश बोअर वेल बंद पडले तेंव्हा खऱ्या अर्थाने या भागातील लोकांना विकास दिसून आला. उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या पाठीमागील भागातील लोक अक्षरशः अशुद्ध गटारीच्या बाजूला असलेल्या एका डबक्यात जमा होत असलेला पाणी भरत होते. हे दृश्य पाहून कोणाच्याही ऱ्हदयाला पाझर फुटेल मन सुन्न करणारे हे दृश्य एन टीव्ही न्युज वृत्तवाहिनीने देशातील सर्व जनतेसमोर आणले.देशातील कानाकोपऱ्यातुन या बातमीला उत्तम प्रतिसाद देत आपल्या तिखट प्रतिक्रिया नोंदवल्याचे दिसून आले.

इच्छुकांची वाढती गर्दी

लोकसभा निवडणूकित जनतेने अतिशय रागाच्या भरात वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारी डोळ्यासमोर ठेवून महायुतीला (सत्ताधार्यांना)प्रतिसाद न देता महाविकास आघाडीला कौल दिला.लोकसभा निवडणूकित धनाड्य विरोधात निष्ठावंत्यांची लढाई खुप गाजली. सुजाण मतदारांनी पैसेवाल्यांना पैशात पुरले तर सतत जनतेच्या संपर्कात राहून अडचणी ऐकून घेणाऱ्याला कौल दिल्याने आता विधानसभा निवडणूकितही पैसेवाल्यांचे काही चालणार नाही, मतदार निष्ठावंत उमेदवारवाराला निवडून देईल अशी आस बाळगून बरेच इच्छुक उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहेत.यात लोहारा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करनारे अशोकराजे सरवदे,उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील शिवसैनिक विलास व्हटकर, आमदार बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामींनी तर आपल्या शासकीय सेवेचा स्वेच्छा सेवानिवृत्ती देऊन उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहताना दिसून येतात.
कोण व्यक्ती राजकारणी आहे आणि कोण राजकारण विरहित समाज सेवा करण्यासाठी राजकारणात उतरणार.? उमरगा लोहारा तालुक्यातील जनता खुप हुशार आहे. आजपर्यंत ज्या यातना सोसाव्या लागल्या त्या पुन्हा आपल्या नशिबी नको म्हणुन अगदी नवखा उमेदवाराला निवडणूक देऊन त्यांच्याकडून काम करून घेणार..? की निवडून आलेल्या उमेदवाराच्या मागे मागे हांजी हांजी करत, आहे त्या दुरावास्थेला शरण जाणार.?उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांची गर्दी वाढत असून महाविकास आघाडीचे तिकीट प्राप्तीसाठी रस्सीखेच होणार हे नक्की यामुळे जागा वाटपाकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.मविआ कडून अनेक इच्छुक नशीब
आजमावत आहेत.त्यात विजय वाघमारे,विलास व्हटकर,सातलींग स्वामी,अशोकराजे सरवदे,सतीश सुरवसे आदींची नावे चर्चिले जात आहेत.

कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ

उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रात कधी पावसाळ्यात ढगफुटी होऊन अतिवृष्टी होते तर याउलट याच भागात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंतीही करावी लागते. आजपर्यंत यावर लोकप्रतिनिधीना आवश्यक उपाययोजना अखल्या नाहीत हे स्पष्ट होतंय.

लाईट चा पत्ताच नसतो

पावसाच्या चार सरी जरी कोसळल्या तरी अक्खी रात्र तालुका अंधारात,बत्ती गुल्ल..!कधी कधी 24 तास लाईट बेपत्ता होते. शेतकऱ्यांना तर आपल्या शेतातील जनावरांनाही पाणी देण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. लाईट बिल वेळेवर भरूनही विद्युत सुरळीत भेटत नाही, लाईट गेल्यावर विद्युत कर्मचाऱ्यांची फोन बंद होतात यामुळे जनतेमध्ये मोठा रोष आहे.

महामार्ग लागत औद्योगिक वसाहत असूनही उद्योग नाहीत

उमरगा शहरातुन राष्ट्रीय महामार्ग जातो त्यालागतच औद्योगिक वसाहत असल्याने या वसाहतीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून एकही ब्लुचिप (नामवंत ए ग्रेड)कंपनी या वसाहतीत आलेली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीचे हे प्रथम कर्तव्य होते की एखादी ब्रँडेड कंपनीला आपल्या भागात आणून रोजगाराभीमुख लोकप्रतिनिधी होण्याचे. आजही स्थानिक युवक रोजगाराच्या शोधात मुंबई पुण्याला पालायन करत आहेत हे कधी थांबणार?

पगारिवर समाधान असणारा आमदार हवा

महाराष्ट्रातील आमदारांना महिन्याला पगार जवळपास दोन लाख ऐशीहजार रुपये(₹2,80,000) याशिवाय भत्ते वेगळे असे एकूण चार ते पाच लाख रुपयाच्या जवळपास पाहिन्याला पगार भेटतोय तर जुलै महिन्यात पगारीत आणखी वाढ़ होऊन तीन लाखाच्या वर होणार असून सदर प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी संचिका प्रलंबित असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून माहिती प्राप्त होतेय.एखाद्या आमदाराने आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या अडचणी, मागण्या सोडवण्यातच आपला वेळ घालावा, गुत्तेदारी-टक्केवारी च्या माध्यमातून कोट्याधीश न होता खऱ्या अर्थाने समाज कार्य करावें होणारे विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील.संबंधित भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व हाताला रोजगार भेटेल.शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि पालक सर्वच समाधानी होतील प्रशासनात धाक राहील आणि अश्या व्यक्तीला निवडून येण्यासाठी पैसे देऊन प्रचार करण्याची आवश्यकताही निर्माण होणार नाही.

गुंडागर्दीत झाला विकास.?

गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर या भागात गुंड वृत्तीचा चांगला विकास झाला असून खून होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.चोऱ्या, दरोडा, लूट या तर सामान्य घटना झाल्या पण खून होणे, लहान सहान कारणावरून चाकू-कत्ती-कुऱ्हाडिने व हंटर ने हाणामाऱ्या आदी घटनात मोठी वाढ़ झाल्याचे दिसते. आजही याभागत गुंड वृत्तीचे अनेक गँग वावरत आसून शहरातील प्रत्येक भागात नवे नवे गँग तयार झाल्याचे नागरिकांतून चर्चीले जाते. पोलीस प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांना याबाबत संप्पूर्ण माहिती आहे पण यावर आळा घालण्यात पोलिसांना यश येत नाही यामागे स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे म्हटले जाते.लोकप्रतिनिधी मनात आणले तर मंदिरासमोरून साधी चप्पल देखील चोरी होऊ शकत नाही मग एवढ्या मोठ्या प्रमाणार गुन्हेगारी वाढत असताना चुप्पी का.? असा सवाल जनतेतून विचारला जातोय.आय पी एस एम रमेश यांच्या कारवाईचे आजही जिल्ह्यात कौतुक होतो तर अश्या अधिकाऱ्यांची जिल्ह्यातुन हाकालपट्टी का केली जाते? ज्या अधिकाऱ्यांचे नाव ऐकून गुन्हेगारांची चड्डी ओली होते असे पोलीस अधिकारी आवर्जून आपल्या जिल्ह्यात/तालुक्यात हवेत अशी मागणी जनतेतुन होत आहे.व्याजपट्टी, अवैध धंदे, गांजा तस्करी, गुटखा निर्माण उदयोग, मटका जुगार अड्डे हे सर्वांच्या डोळ्यादेखत खुलेआम चालतात पण साध्या टिबल सीट चालवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली तरी एखाद्या अजीमाजी लोकप्रतिनिधीचा फोन पोलिसांना आलाच..! मग पोलिसांनी कारवाई तरी कोणावर करावी?

उर्वरित वृत्त पुढील भागात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *