गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथे एका शेतकऱ्यांच्या शेतवस्तीत असणाऱ्या घरात अतिविषारी असलेला इंडियन कोब्रा जातीचा नाग असलेला शेतकरी दिसला त्यांनी तात्काळ लासूर स्टेशन येथील सर्पमित्र रिचर्ड बत्तीसे यांना कॉल केला असता सर्पमित्र बत्तीसे यांनी तात्काळ शिरेगाव गाठले व शेतकरी भाऊसाहेब कऱ्हाळे यांच्या शेतवस्तीवर असणाऱ्या घरात इंडियन कोब्रा जातीचा 2 वर्ष वयाचा साडेसहा फूट लांबीचा नाग मोठ्या शीताफिने पकडला.
रिचर्ड बत्तीसे (सर्पमित्र)सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून सापांच्या बिळामध्ये पाणी जाते त्यामुळे सर्प बाहेर पडतात व मिळेल तिथे जाऊन थांबतात त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सावधानता बाळगावी कारण सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र असतात त्यामुळे सापांना मारू नये तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
प्रतिनिधी रमेश नेटके गंगापुर छत्रपती संभाजी नगर