छत्रपती संभाजीनगर
दिनांक १७ जुलै २०२४ रोजी
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह छत्रपती संभाजीनगर येथे “निळे प्रतीक” या वृत्तपत्राचा १५ वा वर्धापण दिन मोठ्या उत्साहात पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला यावेळेस बोलताना प्रा. छबुराव भांडवलकर म्हनाले
वृत्तपत्रानी देखील आपली बोलीभाषा वापरली पाहिजे, प्रमाण भाषेचा व सामान्य जणांचा काही एक संबंध येत नाही .आपली बोलीभाषा ही प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारी भाषा असते. म्हणूनच निसंकोच आपण आपल्या बोली भाषेचा वापर करावा.असे प्रतिपादन प्रा. छबुराव भांडवलकर यांनी केले.ते निळे प्रतीकच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून व्यास पीठावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आंबेडकरी चळवळीचे वृत्तपत्र निळे प्रतीक हे निष्पृह निर्भीड विचाराचे दैनिक आहे. वंचितांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये हे दैनिक कधीही तडजोड करणार नाही. असेही ते म्हणाले. यावेळी प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले की,निळे प्रतीक दैनिक व्हावे ही आपली, समाजाची इच्छा होती. ही इच्छा अनेक वेळा सर्वांनी जाहीर होती. आज ती इच्छा पूर्ण झाली आहे. अशी गौरवोउदगार कांबळे यांनी काढले.अध्यक्षीय भाषणात अशोक येरेकर यांनी नित्य पाठिंब्याची ग्वाही दिली. हा पुरस्कार वितरण सोहळा १७ जुलै बुधवार रोजी दुपारी एक वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संभाजीनगरचे कार्यकारी अभियंता, अशोक येरेकर यांनी भूषवले. प्रमुख वक्ते म्हणून म्हणून प्रा. भांडवलकर यांची उपस्थिती होती. तर उदघाटक डॉ. जीवन राजपूत होते. डॉ. आंबेडकर बँकेचे अध्यक्ष पी. बी. अंभोरे, छ.संभाजीनगर महानगर पालिकेचे वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे प्रचार्य पी. जे. हिरोडे, प्रा. डॉ
ऋषिकेश कांबळे,एलआईसीचे व्यवस्थापक देवचंद राठोड,रोडे यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती. यावेळी प्रा डॉ. ऋषिकेश कांबळे पुढे म्हणाले की, “निळे प्रतिक” दैनिक व्हावे ही अपेक्षा आपण प्रथम पासून व्यक्त केली होती. ही अपेक्षा आता पूर्ण झाली आहे.
यापुढील काळात निळे प्रतीक हे सर्व समावेशकतेचे धोरण स्वीकारेल आणि सर्व समाज घटकांच्या प्रश्नांना न्याय देईल. आंबेडकरवाद काय असतो हे लोकांना सांगेल.अशी अपेक्षा प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात अशोक येरेकर यांनी सांगितले की,आम्ही सतत निळे प्रतिक दैनिकास साथ देत राहू. सध्याचे राजकीय सामाजिक स्थिती बिकट आहे. अशा स्थितीत दैनिक निळे प्रतीकने खंबीर भूमिका घेतली पाहिजे. असे अशोक येरेकर म्हणाले.
मनपा उपायुक्त संजय सुरडकर यांनी शुभेच्छापर भाषण केले. पी. बी.अंभोरें म्हणाले दैनिक चालवीने अत्यंत जोखमीचे काम आहे. तें मुख्यसंपादक रतनकुमार साळवे सहज करतात. समाज पूर्णपणे पाठीशी आहे, अश्या प्रामाणिक भूमिका घेऊन चालनाऱ्या वृत्तपत्राना आपण जगविले पाहिजे.असे तें म्हणाले. उदघाटक डॉ. जीवन राजपूत म्हणाले की, निर्व्यसणी, उच्च शिक्षित संपादक रतनकुमार साळवे यांच्याकडून शोषित, पिडीत, घटकांकडून खूप अपेक्षा आहे. सर्वसमावेशक असं वृतपत्र सलग १५ वर्ष चालवीने म्हणजे अत्यंत जिकरीचे काम तें करत आहेत. या त्यांच्या मंगलकार्यात आम्ही सदैव सोबत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तुकारामाच्या अभंगाच्या ओळी सादर करुंन त्यांनी उपस्थितितांची दाद मिळवली.अंबादास रगडे यांनी देखील आपले विचार मांडले. प्रास्तविक भाषणात संपादक रतनकुमार साळवे यांनी पंधरा वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. समाजातील अनेक मान्यवरांनी पाठींबा दिल्यामुळेच आम्ही १५ वा वर्धापन दिन साजरा करू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात एकूण ३० जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी धनराज गोंडाने, एन. डी. जिवणे, माणिकराव ढाकरगे, प्रा. भारत सिरसाट, शैलेंद्र मिसाळ, विलास पठारे, अशोक जोहरे, धन्यकुमार टिळक,कवी प्रकाश जाधव, अंबादास रगडे, एकनाथ त्रिभुवन,अँड. विलास पठारे, धम्मपाल दांडगे, डॉ. कोकाटे, मुकुंद सुरडकर, राजू हिवराळे,अरुण वासनकर, अँड विलासराव म्हस्के, आदी मान्यवर उपस्थित होतें.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक साळवे, अंश पवार, दीप पवार, सागर साळवे, राजेंद्र हिवरे, सुधाकर निसर्गन,संकेत साळवे, दिनेश परदेशीं यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमातील उत्साह नजरेत भरणारा होता.वाचकांनी, शुभ चिंतकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले तर आभार प्रतीक साळवे यांनी मानले.
प्रतिनिधी जब्बार तडवी छत्रपती संभाजीनगर