कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई साठी राष्ट्रवादी पवार गट आक्रमक
उमरखेड 🙁 शहर प्रतिनिधी) उमरखेड च्या गो सी गावंडे कॉलेज पासून ते विडूळ पर्यंत सात कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून अवघ्या आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण उखडले असून रस्त्याला भेगा व तडे पडले आहे त्यामुळे सदर निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवून कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे .
तालुक्यातील उमरखेड ते ढाणकी रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे .या रस्त्यावर दरवर्षी काही किलोमीटर काम तर उर्वरित पॅचेस चे काम होत असते .उमरखेड च्या गो सी गावंडे महाविद्यालयापासून ते विडुळ पर्यंत सात कोटी रुपयाचे रस्त्याचे काम सुरू असून सन 2022 मध्ये मंजूर झालेले काम 2024 मध्ये आणि ऐन पावसाळ्यात पावसामध्ये होत आहे . त्यामुळे आठ दिवसातच या रस्त्याचे डांबरीकरण उखडले असून रस्त्याला भेगा व तडे पडले असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.सदर रस्ता हा ग्रामीण भागातील रहदारी साठी व शेतीमाल मुख्यबाजारपेठेत आणण्यासाठी उपयोगात येतो .नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा रस्ता लवकर व मजबूत होण्याकरता अनेक राजकीय सामाजिक संघटनेने आंदोलने केली .असे असताना सद्यस्थितीत चालू असलेले काम निकृष्ट होत असून झालेल्या कामापैकी २० टक्के रस्ता हा अवघ्या आठ दिवसात क्षतीग्रस्त झाला आहे सदर रस्त्याचे खडीकरण झाल्याबरोबर अवघ्या दोन ते तीन दिवसात डांबरीकरण करण्यात आले असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे .तरी सदर काम त्वरित थांबून कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे .यासंबंधीचे निवेदन सा .बा .चे उपविभागीय अभियंता प्रमोद दुधे यांना देण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर जयस्वाल,तालुका अध्यक्ष स्वप्निल कनवाळे,माजी नगरसेवक साजिद जहागीरदार,युवक तालुकाध्यक्ष निवृत्ती वानखेडे,रहमत जहागीरदार , नदीम खान अहसान खान पठाण , रोहित हेलगंड व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते