कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड व गजापूर येथे धार्मिक स्थळावर हल्ला करून विशिष्ट समाजाच्या निरपराध लोकांना मारहाण करण्यात आली . तेथील रहिवाश्यांच्या घरांचे व दुकानांचे अतोनात नुकसान करण्यात आले .या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेध व्यक्त करून हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करावी ,या मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत समाज बांधवांनी निवेदन दिले आहे .
14 जुलै रोजी विशालगड व गजापूर येथे समाज कंटकानी दोन धार्मिक स्थळाचे नुकसान करून येथे राहणाऱ्या नागरीकांचे व दुकानाचे आतोनात नुकसान केले सदर धार्मीक स्थळे ही हिंदु मुस्लीम समाजातील लोकांची श्रद्धास्थाने आहेत . सदर ठीकाणी घरे व दुकाने अतिक्रमाणात असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाने सदर अतिक्रमण काढण्याबाबत स्थगिती दिलेली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . माजी खासदार छत्रपती संभाजी राजे रवींद्र पडवळ बंडा साळुंखे यांनी चिथावणी दिल्यामुळे समाजकंटक तरुणांनी एकत्र येऊन विशालगडावरील पवित्र धार्मिक स्थळावर दगडफेक केली . व परततांना गडाशेजारील गजापूर या गावांमध्ये असलेल्या धार्मिक स्थळाचेही नुकसान केले व तेथे राहणाऱ्या रहिवाश्यांच्या घरांचे व दुकानांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले या हल्ल्यात अनेक लोक गंभीर जखमी झालेले आहेत . त्याप्रमाणे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केल्याने सदर हल्लेखोरावर व त्यांना चेतावणी देणाऱ्या संबंधित चिथावणीखोर नेत्यांवर कठोर कारवाई करावी , भ्याड हल्ल्यात नुकसान झालेल्यांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी सदर कारवाई आठ दिवसाच्या आत न झाल्यास राज्य पातळीवर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रसूल पटेल सोनू खतीब, इरफान ताऊ, कलीम उल्ला खान ,सय्यद अफसर, अझरउल्ला खान, जुबेर कुरेशी ,शकील अहमद, जलील कुरेशी, वाशीफ पठाण ,बाबू हिना ,चुनमिया काजी निसार पेंटर , मोहम्मद नजीर,मोहम्मद इरशाद सय्यद सिकंदर यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते .
