section and everything up until
* * @package Newsup */?> पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी | Ntv News Marathi

येथील शेख इरफान यांच्यावर दिनांक 23 रोजी रात्री नऊच्या दरम्यान नांदेड रोडवरील एम के स्टार कॉम्प्लेक्स समोर वाढदिवस साजरा करून घरी जात असताना शेख मजहर शेख अलाउद्दीन शेख अजहर शेख अलाउद्दीन अरिष खतीब यांनी एकत्र येऊन शेख इरफान, पत्रकार यांच्यावर प्राणघातक करून हाल्ला करून डोक्यावर चाकू मारून गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली याविषयी उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली परंतु उमरखेड पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी कारवाई केली नसल्याने पिढीत शेख इरफान यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार व सर्व संबंधितांना आरोपीवर कारवाही करावी अन्यथा दि.2/जुलैपासून आमरण उपोषण करणार असल्याचे कळविले होते
निवेदन देऊनही कारवाई ना झाल्याने आज दिनांक 02/07/2024 पासून आमरण उपोषण चालू केले आहे

हल्ले करणाऱ्या आरोपी पैकी काही आरोपीवर उमरखेड पोलीस स्टेशनला त्यांनी अनेक गंभीर गुन्हे केले असल्याचे नोंद असल्याने त्यांच्यावर एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करावी, तसेच चाकूने मारून प्राणघातक केला हल्ला व जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे त्यांचेवर कलम 307 ,110, आणि पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीसह या गुन्ह्यातील आरोपींना अभय देणाऱ्या शाहरुख पठाण व जलील कुरेशी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व आरोपींना अभय देणारे पीआय सोळंके, एपीआय सरदार यांच्यावर बदलीची कारवाई करावी या मागणीसाठी आज दुपारी तीन वाजता आमरण उपोषण चालू केलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *