उमरखेड : शहरांमध्ये सर्व ठिकाणी कामे चालू आहेत पण ढाणकी रोड ला लागून असलेला "साक्षी नगर" (जो की २००५चा NA ले आऊट आहे) कित्येक वर्षांपासून जशास तसे आहे .वारंवार नगरपरिषद ला सांगून सुद्धा आता पर्यंत कोणताही मार्ग काढण्यात आला नाही. असे कित्येक पावसाळे गेले पण साक्षी नगर ला नगरपरिषद चे दुर्लक्ष करीत आहे, या ठिकाणी रस्ते व नाली बांधकाम नसल्यामुळे सर्व नालीचे पाणी घरात घुसत आहे व येणे जाणे करण्यासाठी खूप त्रास होत आहे व तसेच शाळेकरू मुलांना सुद्धा जाण्यासाठी खूप त्रास होत आहे कारण रस्ते खराब असल्यामुळे कोणीही शाळेची गाड्या या ठिकाणी टाकण्यास टाळाटाळ करत आहेत. तात्काळ या समस्येचा तोडगा काढण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.!! यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उमरखेड- महागाव विधानसभा चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष 'राजू भैय्या जयस्वाल', युवक काँग्रेस चे युवा नेते रहेमत जहागीरदार,शहर अध्यक्ष नदीम पठाण,सै. तहेजिर,सै.मुसा, अश्कर जांबाज व तसेच साक्षी नगर चे अजीस जांबाज, शफायत पठाण, सै हारून,काझी सर,शकील सर,शाहरुख पठाण आदी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती....
चौकट
साक्षी नगर हा बहु संख्या मुस्लिम आबादी असलेला वॉर्ड आहे ,त्यामुळे या ठिकाणी जाणून बुजून आमच्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे..!!!!!
नदीम पठाण
शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस