उमरखेड़ : एच.डी. एफ़. सी. बँक शाखा उमरखेड पिक लोनसाठी सिव्हिल स्कोअर मागत आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना एक-दोन आठवडे कर्जाची थकीत रकम परतफेड करता आली नाही. या कारणामुळे बँक पिक लोन देण्यास नकार देत आहे. बँकेच्या मते, शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाचेही सिव्हिल खराब असू नये. अन्यथा त्यांना पिक कर्ज दिले जाणार नाही.    तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्ज दोन टप्प्यात वाटप करत आहेत ते पिक कर्ज एक्का टप्प्यात वाटप करण्यात यावा. या सर्व प्रश्नांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड शहराच्या वतीने एच.डी. एफ़. सी.बँक शाखा उमरखेड विरोधात युवा नेते रहमत जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देण्यात आले.  ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते . मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पेरणीची वेळ निघून जात आहे. तसेच दोन वर्षांहून अधिक काळ पाण्याच्या हल्ल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. यवतमाळ आणि विदर्भात शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या कारणास्तव येत्या बुधवारपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न न सुटल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड येथील एच.डी. एफ़. सी.
बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करणार असून बँकेचे कामकाज चालू देणार नाही. *यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते रहेमत जहागीरदार, तालुकाध्यक्ष निवृती वानखेडे, शहराध्यक्ष नदीम पठाण, राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष एड. सलीम सौदागर, ज्येष्ठ नेते सय्यद तहजीर, हाजी इर्शाद, अश्कर जांबाज,अदनान पठाण, खिजर जांबाज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *