उमरखेड :राज्य परिवहन महामंडळाच्या कामगाराच्या वैयक्तिक वसंघटनात्मक प्रश्नांची तथा अडीअडचणीची सोडवणूक आगारातच तात्काळ व्हावी या उदांत हेतूने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडून कामगार पालक दिनाचे आयोजन करण्याचे आदेश उमरखेड आगाराला प्राप्त झाली असून त्यानुसार प्रत्येक सोमवार व शुक्रवार रोजी उमरखेड येथील आगारात कामगार पालक दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे या कामगार पालक दिनानिमित्त कामगारांना भेडसावणाऱ्या वैयक्तिक समस्या व संघटनात्मक समस्या या कामगार दिनाच्या निमित्ताने उपस्थित करता येणार आहेत यातून राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक संबंधितांच्या प्रश्नावर जागचे जागी तिथेच तोडगा काढून त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असून तसेच येथील आगारात प्रवासी राजा दिनाचे आयोजन देखील प्रत्येक सोमवार व शुक्रवार रोजी करण्यात येणार असून यातून विविध समस्या सोडविला जाणार असून यासाठी प्रवासी वर्गणी आपापल्या समस्या आगार व्यवस्थापकाकडे लेखी स्वरूपात कळविण्याचे आवाहन उमरखेड राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापिका प्रमोदिनी किनाके यांनी केले असून या निमित्य आयोजित केलेल्या कामगार पालक दिनाचे व प्रवासी राजा दिनातजास्तीत जास्त कामगार व प्रवासी वर्गांनी आपापल्या समस्या मांडून त्या सोडवून घेण्याच्या दृष्टीने येथील दि. २६।७। २०२४ रोज शुक्रवार विभागीय नियत्रंक मा. अमोल गोंजरी यांच्या उपस्थीत आगार व्यवस्थापका कडे तक्रारी नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले असून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यातून अशा प्रकारे कामगार पालक दिनाचे आयोजन केल्यामुळे कामगार वर्गातून आनंद व्यक्त केल्या जात आहे.