* * @package Newsup */?>
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा पंधरा कोटी रुपयाचा निधी खड्ड्यात ढाणकी ते सावळेश्वर आणि ढाणकी ते गांजेगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह ? | Ntv News Marathi
उमरखेड .( शहर प्रतिनिधी) ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे परंतु शासनाच्या उपलब्ध निधीतून बेसुमार व दर्जाहीन पद्धतीचे कामे करून तालुक्यातील ढाणकी ते सावळेश्वर व ढाणकी ते गांजेगाव या रस्त्याचे कामात मोठा गैरप्रकार झाल्याची ओरड जनसामान्यातून केली जात आहे . याबाबत प्राप्त माहितीनुसार उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते सावळेश्वर व ढाणकी ते गांजेगाव या रस्त्याच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अनुक्रमे सहा कोटी व नऊ कोटी असा एकूण 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या रस्त्याचे काम पुसद येथील नवाब कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते परंतु सदर कंत्राटदार कंपनीने या रस्त्याचे काम करताना शासनाचे नियम व निकष बासनात गुंडाळून मनमर्जीप्रमाणे निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य रस्त्याच्या कामासाठी वापरून सदर रस्त्याच्या कामात डांबराचे प्रमाण देखील कमी प्रमाणात वापरल्यामुळे जेमतेम दिवसातच ह्या दोन्ही रस्त्यावर जागोजागी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे सदर कंट्रक्शन कंपनीच्या विरोधात रस्त्याचे काम सुरू असताना अनेक सामाजिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी केल्या या तक्रारीवर सन 2023 मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अध्यक्ष अभियंता यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सदर रस्त्याचे काम गुणवत्ता पूरक होत नसल्याचा ठपका ठेवून काम बंद केले होते यानंतरच्या काळात सदर कंत्राटदाराला ढाणकी ते गांजेगाव तसेच ढाणकी ते सावळेश्वर या दोन्ही रस्त्याच्या कामासाठी दर्जेदार साहित्य वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु सदर कंत्राटदार कंपनीने आपला पूर्व पार चालत असलेला निकृष्ट कामाचा हातखंडा काही सोडला नाही यामुळे सदर रस्त्याच्या कामाला जेमतेम दिवस होत नाही तोच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडली असून भविष्यात हा रस्ता किती दिवस टिकेल हे सांगणे अवघड होऊन बसले असून सदर रत्यावर मोठमोठी खड्डे पडल्याचे दिसत असुन कोट्यावधी रुपयाच्या रस्ते विकासाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून होत असून बेसुमार व दर्जाहीन पद्धतीची करण्यात आलेली ढानकी ते सावळेश्वर व ढानकी ते गांजगाव या दोन्ही रस्त्यांच्या निकृष्ट कामांची गुण नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करून यात दोषी असलेल्या कंत्राटदार कंपनीवर व सदर कामावर देखरेख ठेवणाऱ्या प्रधानमंत्री सडक योजनेच्या अभियंत्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी पुढे येत असुन हा खड्डेमय झालेला रस्ता पुन्हा करण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे