तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड पंचायत समितीच्या संरक्षण भिंती लगत असलेले अतिक्रमण काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली. तालुक्यातील पंचायत समिती ही जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात येतात व त्याच बरोबर ग्रामीण भागातील वेगवेगळ्या समस्या घेऊन ग्रामस्थ ही हजरी लावतात. परंतु त्यांचे वाहने ठेवण्यासाठी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीच्या संरक्षण भिंतीला लागूनच टिन शेड दुकान, पानपट्टी, गणपती मूर्ती, ग्रॅनाईट, व बंद अवस्थेत चार चाकी वाहने इत्यादी उभे करून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या कास्तकारांना व लोकांना आपली वाहने उभे करण्यासाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे नाईलाज असतो ते आपली वाहने पंचायत समितीच्या आत मध्ये जागा मिळेल त्या ठिकाणी अस्ताव्यस्त लावतात. व आपसामध्ये वाहने लावण्याबाबत त्यांच्यात शाब्दिक चकमक देखील होताना दिसून येते. या गंभीर परिस्थिती असल्यामुळे या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा संयुक्त पत्रकार संघातर्फे देण्यात आला. यावेळेस संघाचे शेख इरफान, रितेश पाटील कदम, सुरेंद्रनाथ दळवी, गजानन वानखेडे, शेख तहसीन, ज्ञानेश्वर लोखंडे, व लोखंडे सर उपस्थित होते.