जमाते इस्लामी हिंद महिला विभागाची मागणी
राष्ट्रपती आणि राज्यपालांना दिले निवेदन
प्रतिनिधी
उमरखेड :-जमात इस्लामी हिंद उमरखेड महिलांच्या वतीने आज देशात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या विरोधात आपला आवाज बुलंद करून निषेध नोंदविण्यात आला . उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून देशाच्या महामहीम राष्ट्रपती व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना या संदर्भात निवेदन पाठविण्यात आले.
यात बदलापूर, ठाणे येथील दोन लहान मुलींचे लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रयत्न,तसेच पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आर.जी. कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षु डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा निषेध करून सरकार व न्यायालयाकडे कडक कारवाईची मागणी तसेच महिलांवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी राज्यपालां कडे उपाय योजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली .
निवेदनाद्वारे लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी सल्ला,तात्काळ कायदेशीर मदत आणि वैद्यकीय काळजी, सहाय्यता प्रणालींची स्थापना करण्यात यावी.या प्रकरणांची सर्वसमावेशक चौकशी करून पीडितांना न्याय मिळावा याकरिता कायदा व्यवस्थेवरील विश्वास पुनस्र्स्थापित करण्यासह सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कडक सुरक्षा नियमावली राबवून अश्या ठिकाणी सुरक्षा कॅमेरे, चांगली प्रकाशयोजना, आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींचा समावेश करावा,महिलांचा आदर वाढविण्यासाठी,लैंगिक हिंसाचाराबाबत जनजागृती करण्याक्साठी शैक्षणिक उपक्रम राबवून समाज स्तरावर सहमतीच्या महत्त्वाविषयी आणि महिलांविरुद्ध हिंसाचाराचे गंभीर परिणाम याबद्दल सरकारने जागरूकता कार्यक्रम आयोजित करावा.ह्या सर्व मागण्या निवेदनाद्वारे राज्यपालाकडे करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतांना सरोज ताई देशमुख , शारदाताई धात्रक , नुसरत खान , रुखसाना खान , हुमेरा काझी , जबीन शहा , आरेफा नसीर , नाजेमा हा हमिद , नाजीया मुदस्सीर , मरीयम मुस्तकीत या सह असंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या .